दीक्षा सोहळ्याच्या वर्धापनदिनापूर्वी दीक्षाभूमी येथील स्टेजचे बांधकाम करा – भदंत ससाई यांचे मुख्यमंत्री शिंदे यांना पत्र

नागपूर :- धम्मचक्र प्रवर्तनदिन, अशोक विजयादशमीच्या तीन आठवड्यांपूर्वी दीक्षाभूमी येथील मुख्य स्टेजचे संपूर्ण बांधकाम करण्यात यावे, अशा आशयाचे निवेदन प. पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष तथा धम्मसेना नायक भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी पाठविले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लाखो बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. धम्मचक्र प्रवर्तन दिन, अशोक विजयादशमीला दीक्षा सोहळ्याचा वर्धापनदिन मोठ्या थाटात साजरा केला जातो. तीन दिवस कार्यक्रम चालतो. मुख्य सोहळ्यासाठी देश-विदेशातील पाहुणे येतात. त्यासाठी भव्य असा स्टेज तयार करण्यात येतो. दर वर्षाला नवीन स्टेज बांधावा लागतो. ही बाब लक्षात घेता राज्य शासनाने कायमस्वरूपी स्टेजचे बांधकाम निधी मंजूर केला आणि २०२३ पासून स्टेजच्या बांधकामाला सुरुवात झाली. स्टेजचे बांधकाम बर्‍यापैकी पूर्ण झाले असले तरी लोखंडी सळ्या मोकळ्या असून फिनिशिंग अद्याप झालेले नाही.

धम्मचक्र प्रवर्तन दिनाला पन्नास दिवस शिल्लक आहेत. मुख्य सोहळ्याच्या तीन आठवड्यांपूर्वी स्टेजचे बांधकाम पूर्ण झाल्यास नियोजन आखण्यासाठी सोयीचे होईल, त्या अनुषंगाने भदंत ससाई यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना निवेदन पाठविले आहे. राज्य शासनाकडून संबधित एजन्सीला काम सुरू करण्याचे आदेश देण्यात यावे, असे निवेदनात म्हटले आहे. यासंदर्भात नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मीना यांच्याशी संपर्क साधला असता स्थगिती उठल्यास त्वरित कामाला सुरुवात करण्यात येईल, असे सांगितले.

एनएमआरडीएने केली पाहणी

दरम्यान अंडरग्राऊंड पार्किंगसाठी तयार करण्यात खड्डा समतल करण्यात येत आहे. अर्ध्यापेक्षा अधिक काम पूर्ण झाले असून बुधवारी सकाळी भदंत ससाई यांच्या उपस्थितीत कामाची पाहणी करण्यात आली. याप्रसंगी नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता संजय चिमूरकर, सहायक अभियंता पंकज पाटील, सुरक्षा अधिकारी सिद्धार्थ म्हैसकर उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

स्वच्छ नागपूर साकारण्यासाठी मनपाची “आत्मनिर्भर वार्ड” संकल्पना 1 सप्टेंबरपासून

Thu Aug 22 , 2024
– नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी होण्याचे आवाहन नागपूर :- स्वच्छ, सुंदर आणि स्वस्थ नागपूर साकारण्यासाठी नागपूर महानगरपालिका कार्यतत्पर आहे. मनपाद्वारे 1 सप्टेंबरपासून शहरात “आत्मनिर्भर वार्ड” संकल्पना राबविण्यात येणार आहे, आत्मनिर्भर वार्ड संकल्पनेच्या अनुषंगाने नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने शहराला स्वच्छ, सुंदर आणि स्वस्थ साकारण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन मनपाद्वारे करण्यात आले आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात व अतिरिक्त आयुक्त […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com