भारतीय बौद्ध परिषदेतर्फे बुद्ध जयंती 

नागपूर :- तथागत गौतम बुद्धाचा जन्म, ज्ञानप्राप्ती व निर्वाण या तीनही गोष्टी वैशाख पौर्णिमेला घडून आल्या, म्हणून वैशाख पौर्णिमेला त्रिगुणी पौर्णिमा सुद्धा म्हटल्या जाते व या पोर्णिमेला जागतिक स्तरावर अनन्य साधारण महत्व आहे. त्यामुळे या दिवसाचे औचित्य साधून इंद्रप्रस्थ नगर भामटी येथील इंडियन बुद्धिस्ट कौन्सिल (भारतीय बौद्ध परिषद) द्वारा तथागत संथागारात बुद्ध जयंतीचा भव्य कार्यक्रम करण्यात आला.

या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्ते व पालीचे अभ्यासक उत्तम शेवडे होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवानिवृत्त अधिकारी रायभान पाटील होते. यावेळी माजी न्यायमूर्ती के के माटे व संस्थेचे सचिव श्याम बारसागडे मंचावर उपस्थीत होते.

उत्तम शेवडे यांनी याप्रसंगी बुद्ध काळापासून तर आत्तापर्यंतचा क्रांती-प्रतिक्रांतीचा इतिहास सांगून नवीन पिढीने भारतीय धम्मा सोबतच संविधानाच्या रक्षणाकरता मताचा अधिकार प्रामाणिकपणे बजावावा असे आवाहन केले.

याप्रसंगी ऍड जोशना सवाईथुल यांच्या दिशानिर्देशात तथागत बुद्धांनी पंचवर्गीय भिक्खूंना दिलेल्या धम्मचक्र प्रवर्तनाच्या प्रथम संदेशाला नाट्यरूपाने बसवून प्रदर्शित केले. आंबेडकर जयंती निमित्त या परिसरात यापुर्वी घेण्यात आलेल्या विविध प्रकारच्या स्पर्धेत यशस्वी झालेल्या स्पर्धकांना याप्रसंगी प्रमुख पाहुणे उत्तम शेवडे व रायभान पाटील यांच्या हस्ते प्रज्ञा पाटील, सनया उके यांचे सहित अनेकांना बक्षीस वितरणही करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारतीय बौद्ध परिषदेचे महासचिव रमेश गजभिये यांनी तर समारोप एन आर उके यांनी केला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

भंते अमरज्योती धम्मदेसना महाविहारात बुद्ध, आंबेडकर जयंती व बुद्धमूर्ती स्थापना समारोह संपन्न

Wed May 10 , 2023
नागपूर :- बेसा-बेलतरोडी परिसरात असलेल्या अमरज्योती नगर येथे भन्ते अमरज्योती धम्मदेशना महाविहारात तथागत बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सव घेण्यात आला. या प्रसंगी भिक्खू संघ, क्रांतीज्योती उपासीका संघ व बुद्ध विहार उपासक संघाच्या प्रमुख उपस्थितीत बुद्ध मूर्तीची मिरवणूक काढून महाविहारात स्थापना करुन महापरित्राण पाठ करण्यात आले. यावेळी शांतरक्षित महाथेरो व प्रियदर्शी महाथेरो यांच्या प्रमुख उपस्थितीत महाथेरो जीवन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com