संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 3- नागपूरच्या दौऱ्यावर आलेले बहुजन समाज पार्टीचे राज्यसभा सांसद व राज्याचे प्रभारी अशोक सिद्धार्थ यांची भेट घेऊन वरिष्ठ बसपा नेता व पूर्व नागपूर जिल्हा प्रभारी किशोर गेडाम उर्फ भाऊसाहेब यांनी केंद्र सरकारकडे प्रलंबित असलेला प्रस्ताव ज्या प्रस्तावामध्ये “जयभीम” नाऱ्या चे जनक बाबू हरदास एल एन यांच्या आठवणी मध्ये “टपाल तिकीट”प्रकाशित करण्याचे म्हटले आहे.या प्रस्तावाचे समर्थन करून केंद्र सरकारने बाबू हरदास एल.एन. यांच्या आठवणीत “टपाल तिकीट” प्रकाशित करावे यासाठी शिफारस करण्याची मागणी केली. आठवणीसाठी बाबू हरदास एल एन मागासवर्गीय संस्था कामठी या संस्थेने जिल्हाधिकारी च्या माध्यमाने नियमाप्रमाणे टपाल तिकीट चा प्रस्ताव तयार करून केंद्र सरकार व राज्य सरकारला पाठविला आहे. व संस्थेने मागणी केली आहे की बाबू हरदास एल एन यांच्या 125 व्या जयंतीच्या अगोदर केंद्र सरकारने बाबू हरदास यांच्या आठवणीत “टपाल तिकीट “प्रकाशित करावे. संस्थेच्या प्रस्तावाचे समर्थन करीत खासदार अशोक सिद्धार्थ म्हणाले की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून मी टपाल टिकट लवकरात लवकर प्रकाशित करण्यासाठी शिफारस करणार आहे. याप्रसंगी राज्याचे प्रभारी सुनील डोंगरे, महासचिव नागोराव जयकर, राज्याचे कोषाध्यक्ष महेंद्रा रामटेके, जिल्हा प्रभारी विजयकुमार डहाके, जिल्हा अध्यक्ष संदीप मेश्राम, नागपूर शहराध्यक्ष इंजिन.भांगे, नगरसेवक मो. इब्राहिम इब्राहिम टेलर, योगेश लांजेवार, लाईन सचिव उत्तम शेवडे, पूर्व जिल्हाध्यक्ष विलास सोमकुवर, महेश सहारे, अमित बागेश्वर, एडवोकेट आकाश खोब्रागडे, नागपूरचे अध्यक्ष जगदीश गजभिये, अमित सिंग, कामठी विधानसभा क्षेत्राचे पूर्व अध्यक्ष इंजि. विक्रांत मेश्राम, कामठी शहर महिला विंगच्या अध्यक्षा सुनीता ताई रंगारी, विलास मून ,नितीन वंजारी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
बाबू हरदास एल एन यांच्या स्मरणार्थ टपाल तिकीट प्रकाशित करण्याच्या मागणीचे बसपाचे निवेदन
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com