बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेश चे केंद्रीय प्रभारी माजी राज्यसभा सांसद राजाराम आज सकाळी नागपुरात येऊन गेले. त्यांनी नागभवन येथे बसपाच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेऊन बहन मायावती यांचे दिशा निर्देश दिले. यावेळी त्यांचे सोबत महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष ॲड सुनील डोंगरे होते.
ठरल्यानुसार सकाळी सात वाजता बसपाचे सर्व मुख्य कार्यकर्ते नाग भवन येथे एकत्र झाले होते. दोन दिवसापूर्वी बसपा च्या राष्ट्रीय अध्यक्षा बहन मायावती यांनी महाराष्ट्राचे केंद्रीय प्रभारी म्हणून मध्य प्रदेशातील माजी खासदार राजाराम यांची निवड केली. काल त्यांनी मुंबई येथील बसपा च्या प्रदेश मुख्यालयाला भेट देऊन कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या. त्यानंतर आज सकाळी त्यांचे नागपुरात आगमन होताच नागपुरातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे भव्य स्वागत केले.
केंद्रीय प्रभारी राजाराम यांनी स्थानिक सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांची ओळख करून घेतली. त्यानंतर त्यांनी बहन मायावती यांनी दिलेले दिशा निर्देश सांगितले. महाराष्ट्र ची 6 झोन मध्ये विभागणी केली असून शिष्टमनुसार काम चालेल, व त्यासाठी स्वतःची बुद्धी, स्वतःचा पैसा, स्वतःची शक्ती वापरून मान्यवर कांशीरामनी दिलेल्या व बहनजी देत असलेल्या दिशा निर्देशा नुसार बहुजनात बंधुभाव वाढवून आपली शक्ती वाढवण्याचे आवाहन केले.
बाबासाहेबांनी सांगितले ते आम्ही ऐकले नाही, कांशीरामयानी सांगितले तेही ऐकले नाही, त्यामुळे बहुजन समाजाची अशी दैनावस्था झालेली आहे. ती दूर करायची असेल तर बहन मायावती यांच्या दिशा निर्देशानुसार कार्य करावे लागेल. कारण आमच्या उत्तर भारतातील सर्वांच्या अपेक्षा महाराष्ट्र व त्यातही नागपूर करांपासून अधिक आहेत, कारण त्यांना बाबासाहेब व मान्यवर कांशीराम यांचा भरपूर सहवास लाभलेला आहे.
चुका या व्यक्तीकडून होत असतात, आपण मिशनचे कार्यकर्ते असल्याने मिशन ला नुकसान होईल असे कसलेही काम करू नये, किंवा तसे वागू नये. ज्याची चूक होत असेल त्याच्या ती नजरेत आणून द्या व त्याला ती दुरुस्त करण्याची संधी द्या. व हे करत असताना आपल्या अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी व धार्मिक अल्पसंख्यांक समाजाला नुकसान होणार नाही याची काळजी घ्या असा प्रेमाचा सल्लाही त्यांनी दिला.
याप्रसंगी प्रामुख्याने महाराष्ट्र प्रदेशचे महासचिव पृथ्वीराज शेंडे, मीडिया प्रमुख उत्तम शेवडे, नागोराव जयकर, मंगेश आकरे, मोहन रईकवार, नागपूर जिल्ह्याचे रंजना ढोरे, राजकुमार बोरकर, योगीराज लांजेवार, माजी नगरसेवक संजय जयस्वाल, जितेंद्र घोडेस्वार, वर्धेचे जिल्हाध्यक्ष अनोमदर्शी भैसारे, अमरावतीचे जिल्हाध्यक्ष अजय गोंडाणे, नागपूर जिल्हा महासचिव चंद्रशेखर कांबळे, अभिलेष वाहने, बुद्धम राऊत, भानुदास ढोरे, जीवन वाळके, संजय सोमकुवर, तपेश पाटील, अजय उके, उमेश मेश्राम, महेश वासनिक, सुधाकर सोनपिपळे, प्रज्ञा दुपट्टे वर्धा, अनंत लांजेवार अमरावती आदी प्रमुख पदाधिकारी व जेष्ठ कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.