नागपूर :- आपल्या न्याय हक्काच्या मागणीसाठी 28 वर्षांपूर्वी विधान भवनावर काढण्यात आलेल्या मोर्चात शासनाच्या निष्काळजी मुळे 114 आदिवासी गोवारी शहीद झाले. त्यांच्या 28 व्या स्मृती प्रित्यर्थ नागपूर जिल्हा बसपाच्या वतीने प्रदेश सचिव रंजना ढोरे, विजय कुमार डहाट, मीडिया प्रभारी उत्तम शेवडे, जिल्हा प्रभारी राहुल सोनटक्के, जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम, जिल्हा उपाध्यक्ष अमित सिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत आदरांजली वाहण्यात आली.
याप्रसंगी “दलित आदिवासी ओबीसी एकता जिंदाबाद, आदिवासी मूलनिवासी है, एससी एसटी ओबीसी भारत के है मूलनिवासी, आदिवासी भाईयों के सन्मान में बीएसपी मैदान मे, आदिवासी समाजाला न्याय मिळालाच पाहिजे, शहीद गोवारी अमर रहे, संविधान के सन्मान में बीएसपी मैदान में, महापुरुषो के सन्मान में बीएसपी मैदान मे, तख्त बदल दो ताज बदल दो बेईमानो का राज बदल दो” आदि घोषणा देत देत 114 शहीद गोवारीना स्मृति चक्र वाहून आदरांजली व्यक्त करण्यात आली.
याप्रसंगी प्रामुख्याने संजय जयस्वाल, महेश सहारे, नरेश वासनिक, सदानंद जामगडे, सचिन मानवटकर, मनोज गजभिये, ऍड. विजय वरखडे, वीरेंद्र कापसे, प्रवीण पाटील, सुधाकर सोनपिपळे, बबीता डोंगरवार, प्राध्यापक सुनील कोचे, नितीन वंजारी, राजेंद्र सुखदेवे, सुरेंद्र डोंगरे, प्रकाश फुले, संभाजी लोखंडे, विलास सोमकुवर, प्रताप तांबे, गौतम गेडाम, निरंजन जांभूळे, सावलदास गजभिये, जगदीश गेडाम, भानुदास ढोरे आदि प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी बसपा नेत्यांनी आदिवासीवर अन्याय करणाऱ्या तत्कालीन काँग्रेस-राकाँ व अलीकडच्या भाजप-सेना सरकारचा जाहीर निषेध केला.