नागपुर – नुकत्याच झालेल्या निवडणुकीत बसपा ला अपेक्षेप्रमाणे यश न आल्याने बसपाच्या राष्ट्रीय नेत्या बहन मायावतीजी ह्यांनी देशपातळीवर संघटनेची पुनर्बांधणी ची सुरुवात केली असून त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र प्रदेश स्तरावर दोन दिवसीय एका प्रशिक्षण व चिंतन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रदेश प्रशिक्षण व चिंतन शिबिर 9 व 10 एप्रिल रोजी पुण्याच्या कॅम्प परिसरात होत असून याला प्रमुख मार्गदर्शक बसपा चे राष्ट्रीय सचिव व राज्यसभा खासदार डॉक्टर अशोक सिद्धार्थ उपस्थित राहून दोन दिवसीय या शिबिराला मार्गदर्शन करतील. या चिंतन शिबिराला महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातून आजी माजी पदाधिकारी व प्रमुख लिडिंग कार्यकर्त्यांना निमंत्रीत करण्यात आले आहे.
ऍड सुनील डोंगरे विदर्भाचे प्रमुख यांचे नागपुरात कार्यकर्त्यांनी स्वागत केले
बसपा च्या राष्ट्रीय नेत्या बहन मायावतीजी ह्यांनी ऍड सुनिल डोंगरे ह्यांची प्रदेश प्रभारी म्हणून निवड केली. सुनील डोंगरे हे मूळ वर्धेचे, त्यांनी जीवन विमा निगम मधून अधिकारी पदावरून स्वेच्छा निवृत्ती घेतल्याने पक्षाने 15 मार्च रोजी त्यांच्यावर विदर्भाची स्वतंत्र जबाबदारी दिली. नागपुरातील प्रदेश कार्यालयात काल त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. या प्रसंगी त्यांनी विदर्भात बसपा किंग व किंगमेकर ची भूमिका निभावेल असा आशावाद व्यक्त केला.
या प्रसंगी प्रदेश कोषाध्यक्ष महेंद्र रामटेके, प्रदेश सचिव रंजनाताई ढोरे, माजी प्रदेश सचिव उत्तम शेवडे, नागपूर जिल्हा प्रभारी विजकुमार डहाट, जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम, शहराध्यक्ष राजीव भांगे, शहर प्रभारी चंद्रशेखर कांबळे, जिल्हा महासचिव प्रताप सुर्यवंशी, जिल्हा महिला अध्यक्ष सुरेखाताई डोंगरे ह्यांनी मार्गदर्शन करुन प्रामुख्याने पक्षाचा धावता आढावा घेतला.
यावेळी नागपुरातील महापौर बनाओ अभियान यशस्वी करण्याच्या दृष्टीने अनेक कार्यकर्त्यांनी विधायक सूचना मांडल्या त्यात प्रामुख्याने मनोज निकाळजे, महेश वासनिक, ओपुल तामगाडगे, चंद्रशेखर कांबळे, अमित सिंग, सचिन कुंभारे, प्रीतम खडतकर, उमेश मेश्राम ह्यांचा समावेश होता.
यावेळी विलास सोमकुवर, राजकुमार बोरकर, महेश सहारे, अजय डांगे, सागर लोखंडे, योगेश लांजेवार, प्रवीण पाटील, जगदीश गजभिये, सुरज येवले, अभिलेश वाहाने, संजय जैस्वाल, इब्राहीम टेलर, गौतम पाटील, सदानंद जामगडे, अड आकाश खोब्रागडे, गौतम गेडाम, मुकेश मेश्राम, हर्षवर्धन जिभे, बाळू मेश्राम, चंद्रशेखर भंडारे, बबन पाटील, तुषार साखरे, विवेक सांगोडे, प्रकाश फुले, प्रीती बोदेले, संदीप कांबळे, पालीराम कराडे, संजय पाली अश्या असंख्य कार्यकर्त्यांनी अड डोंगरे ह्यांना शुभेच्छा दिल्या.