नागपूर :- हिंगणा तालुक्याच्या ईसासनी येथील भीमनगर या झोपडपट्टीत राहणाऱ्या अंकिता नारळे या गरीब मुलीने शिकवणी न लावता एम पी एस सी ची परीक्षा उत्तीर्ण केली. अंकिताचे एम एस सी पर्यंतचे शिक्षण झाले असून ही परीक्षा पास केल्याने मुंबई मंत्रालयात लिपिक या पदावर तिची नियुक्ती करण्यात आली.
समाजातील गरीब होतकरू व ग्रामीण विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी म्हणून नागपूर जिल्हा बसपा चे अध्यक्ष संदीप मेश्राम, जिल्हा प्रभारी राहुल सोनटक्के, मीडिया प्रभारी उत्तम शेवडे, हिंगना विधनसभा अध्यक्ष पराग रामटेके, महासचिव महेंद्र मेश्राम, प्रफुल मेश्राम, दिनेश वासनिक, श्रावण गोस्वामी, आश्विन टेम्भूरने, अशोक ढोके, सौरभ घरड़े, अस्मिता टेंभुरने, रूपा वाघमारे, सुजाता कराडे, कर्मरेखा काम्बले, अनिता गेडाम, जयश्री रंगारी, पंचशिला धुळे आदिंनी तिच्या निवासस्थानी जाऊन तिचा सत्कार केला.