नागपूर :-छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रथम गुरु मातोश्री राजमाता जिजाऊ यांच्या 425 व्या जयंती निमित्त शुक्रवारी तलावा शेजारी असलेल्या त्यांच्या तैलचित्राला माल्यार्पण व अभिवादन करून आज नागपूर जिल्हा बसपाने त्यांचा जन्मोत्सव साजरा केला.
महाराष्ट्र प्रदेश बसपाच्या सचिव रंजना ढोरे यांच्या अध्यक्षते खाली आजचा जिजाऊ जन्मोत्सव पार पडला. याप्रसंगी प्रदेश सचिव पृथ्वीराज शेंडे, प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे, नागपूर जिल्हा प्रभारी राहुल सोनटक्के, जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम, ऍड सुरेश शिंदे यांनी याप्रसंगी जिजाऊंच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा उपाध्यक्ष अमित सिंग यांनी तर समारोप मध्य नागपूरचे अध्यक्ष प्रवीण पाटील यांनी केला.
याप्रसंगी जय जिजाऊ -जयभीम, जयशिवाजी -जयभीम, जय संभाजी जयभिम, स्वराज्य रक्षक जिजाऊ-छत्रपती शिवाजी -छत्रपती संभाजी अमर रहे, बहुजन महापुरुषोके सन्मान में बीएसपी मैदान मे, संविधान के सन्मान में बीएसपी मैदान मे, आदि उत्साहवर्धक घोषणा देण्यात आल्या.
याप्रसंगी प्रामुख्याने महिला नेत्या वर्षा वाघमारे, प्रा करुणा मेश्राम, माया उके, माजी जिल्हाध्यक्ष राजकुमार बोरकर, विलास सोमकुवर, योगेश लांजेवार, सदानंद जामगडे, सुरेंद्र डोंगरे, अभिलेश वाहाने, नितीन वंजारी, प्रकाश फुले, निरंजन जांभुळे, शंकर थुल, विलास मून, सहदेव पिल्लेवान, मनोज गजभिये, अंकित थुल, बुद्धम राऊत, वीरेंद्र कापसे, भानुदास ढोरे, अभय डोंगरे, उत्तर नागपूर चे अध्यक्ष जगदीश गजभिये, प्रा सुनील कोचे, अरविंद तायडे, विकास नारायणे, सचिन बागडे, शामराव तिरपुडे, अनिल मेश्राम आदि प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.