अमरदिप बडगे, प्रतिनिधी
पालकमंत्रीसुध्दा दिले चौकशी आदेश
गोंदिया :- जिल्ह्यातील शासकीय आदिवासी शाळा मजितपूर येथील १२० आदिवासी मुलं मुली खेळण्यासाठी तिरोडा तालुका येथील कोयलारी या आश्रम शाळेत खेळण्यासाठी एकाच टेंपो मध्ये कोंबून नेण्यात आले. आणि परत हि त्याच टेंपो मध्ये कोंबून आणत असताना काही मुलं मुली टेंपो मध्येच बेशुद्ध झाले असता. त्यांना एकोडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार साठी आण्यात आले असुन त्यांच्या वर उपचार सुरु असुन त्यातील एका मुलीला गोंदिया येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले होते.
या अगोदर जिल्हामध्ये आदिवासी मुलांना मारहाण प्रकरणामध्ये दोन शिक्षकांनी निलंबित केले होते.
शासकीय आश्रमशाळा मुख्याध्यापक निलंबित
आदिवासी विकास विभाग शासकीय आश्रमशाळा शाळा मजितपुर येथील मुख्याध्यापकाला निलंबीत करण्यात आले आहे. या घटनेची दखल घेत आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावीत यांनी दखल घेत मुख्याध्यापक निलंबित करण्याचे आदेश दिले आहे तसेच मुलाना अशा प्रकारे कोबुन नेणे चुकीचे आहे असे म्हटले आहे. यावर नक्कीच कारवाई करण्याचे निर्देश देखील मंत्र्यांनी दिले आहे.
पालकमंत्री यांनी जिल्हाधिकारी दिले चौकशीचे आदेश..
या घटनेची दखल नवनिर्वाचित पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेत ट्रक मध्ये विद्यार्थी ची वाहतुक करणे चिंताजनक बाब आहे असे म्हटले आहे.यावर गोंदिया जिल्हाधिकारी यांना घटनेची चौकशी करुन तीन दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहे.