सीरिया मैदानात तरुणावर प्राणघातक हल्ला.

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी ता प्र 7 :- दरवर्षीप्रमाणे यावर्षोसुद्धा दसऱ्याच्या मेळाव्यानिमित्त सीरिया मैदानात सरू असलेल्या सीमोल्लंघन कार्यक्रमासह रावण दहन कार्यक्रम आटोपल्यानंतर सर्व मंडळी घरी जाण्याच्या बेतात असताना सीरिया मैदानात शिवीगाळ दिल्याच्या वादातून हरदास नगर रहिवासी तरुणाला तीन आरोपितांनी संगनमताने लोखंडी रॉड ने प्राणघातक हल्ला करून गंभीर जख्मि केल्याची घटना गतरात्री 5 ऑक्टोबर ला घडली असून जख्मि तरुणाचे नाव मोहम्मद फहीम उर्फ गोलू मोहम्मद अलीम शेख वय 24 वर्षे रा हरदास नगर कामठी असे आहे तर आरोपीचे नावे इम्रान भांजा,शुभम कचरा गाडीवाला,सद्दाम तिन्ही राहणार कामठी असे आहे.या तिन्ही आरोपीविरुद्ध भादवी कलम 326,34 अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

वैनगंगा नदीत बुडून युवकाचा मृत्यू.

Fri Oct 7 , 2022
अमरदिप बडगे,प्रतिनिधी गोंदिया :- गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील सरांडी येथील एका युवकाचा वैनगंगा नदी मांडगी येथे पाण्यात बूडून मृत्यू झाल्याची दुदैवी घटना 1वाजे दरम्यान घडली आहे. मृतक युवकांचे नाव प्रणीकेत पराते वय 24 वर्षे राहणार सरांडी असुन तो माडगी येथील वैनगंगा नदीवर नातेवाईकांच्या पिंडदान विधी कार्यक्रमात गेला होता. पाण्याची खोलवर पातळी त्याला समजून न आल्याने तो पाण्यात बुडाला अवघ्या दोन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!