आशिर्वाद नगरच्या ज्येष्ठ नागरिक क्लबचा उपक्रम-आरोग्य शिबीर

नागपूर – ज्येष्ठ नागरिक क्लब आशिर्वाद नगर चा वतीने सहाव्या वर्धापन दिनानिमित्त गुढीपाडव्याच्या शुभदिनी भव्य आरोग्य व नेत्र तपासणी शिबीर घेण्यात आले. या शिबिरात रक्तदाब, अस्थिरोग, स्त्रीरोग, दंन्तचिकीत्सा, व नेत्र तपासणी यां सह सर्व सामान्य आरोग्य तपासणी करून निःशुल्क औषध वितरण करण्यात आले. सुर्योदय हाॅस्पिटल उमरेड रोड नागपूर, शासकीय दंन्त महाविद्यालय, नेत्र तंन्ज्ञ डॉ.संजय लहाने यांच्या सौजन्याने व सिध्देश्वर कोमजवार यांच्या विषेश सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षस्थानी वामनराव साळवे तर उद्घाटक डॉ.दिपक शेंडेकर हे होते. तसेच व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून सक्करदरा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक धनंजय पाटील,हुडकेश्वर पोलिस स्टेशन चे वरीष्ठ पोलिस निरीक्षक सार्थक नेहेते, शिवसेना शिव माथाडी कामगार सेनेचे शहर अध्यक्ष सिध्देश्वर कोमजवार, ज्येष्ठ नागरिक महामंडळाचे विदर्भ संपर्क प्रमुख प्रमोदराव अंजनकर, तसेच ज्येष्ठ नागरिक क्लबचे संस्थापक सभासद सुरेशराव कदम हे उपस्थित होते. अतिथींचा हस्ते दिप प्रज्वलन व धन्वंतरी पुजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रास्ताविकात क्लबचे कार्याध्यक्ष विजय कडु यांनी गुढीपाडव्याचे महत्त्व सांगितले. “निवृत्ती नंतरही ज्येष्ठ नागरिक विधायक कार्यकरत आहेत ही खुपचं आनंदाची गोष्ट आहे. “अशा शब्दांत धनंजय पाटील यांनी समाधान व्यक्त केले. तर “अशा ज्येष्ठ नागरिकांनचे पाठबळ आमच्याकरीता प्रेरणादायी आहे “असा विश्वास सार्थक नेहेते यांनी व्यक्त केला. डाॅ दिपकजी शेडेकर यांनी शिबीराचे उद्घाटन झाल्याचे घोषित केल्यानंतर आरोग्य तपासणीला सुरुवात झाली. शिबिरात सुर्योदय हाॅस्पिटलचे संचालक सचिन पारधी, डॉ चित्रा ठाकरे,कोविड लसिकरणासाठी आलेले ईशान झिलपे, नगरसेविका सौ.स्नेहल बिहारे, माजी नगरसेवक अजय बुग्गेवार यांच्या सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन गोविंद सालपे यांनी केले तर आभार क्लबचे सचिव श्याम कामत यांनी केले. ज्येष्ठ  नागरिक क्लबचा सर्व सभासदांचा अथक परिश्रमाने हे शिबिर यशस्वी झाले
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

आतंकवादी ठिकानों का भंडाफोड़, जम्मू-कश्मीर के पुंछ में भारी मात्रा में हथियार बरामद

Mon Apr 4 , 2022
जम्मू-कश्मीर – सुरक्षा बल के अधिकारियों ने बताया कि बरामद किये गये हथियार और गोला-बारूद में दो एके-47 राइफल के साथ दो मैगजीन और  63 गोलियां, एक 223 बोर की एके आकार की बंदूक, उसकी दो मैगजीन तथा 20 गोलियां और एक चीनी पिस्तौल शामिल है। जम्मू-कश्मीर में सुरक्षा बलों ने पुंछ जिले में नियंत्रण रेखा के पास स्थित एक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com