नागपूर : उत्तरप्रदेशसह गोवा, उत्तराखंड, मणिपूर या राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाला मिळालेले घवघवीत यश हे देशाचे लोकप्रिय यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या सत्ताकाळात घेतलेल्या निर्णयाचे फलीत आहे, अशी प्रतिक्रिया भाजपा प्रदेश सचिव ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी दिली.
उत्तरप्रदेशसह चार राज्यांमध्ये भाजपाला मिळालेल्या यशावर त्यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून प्रतिक्रिया व्यक्त केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील सत्ताकाळात अनेक महत्वाचे निर्णय घेतले, कोरोना या वैश्विक महामारीच्या काळातही लोकहिताचे मोठे कार्य केले. यात नागरिकांना मोफत अन्नधान्य, शेतकरी, घरकाम करणा-या महिलांना डीबीटीद्वारे थेट आर्थिक मदर, स्थलांतरीत कामगारांना मदत, लसीकरण या प्रधानमंत्र्यांच्या लोकहितवादी कार्याची पुरेपुर अंमलबजावणी करीत योगी आदित्यनाथ यांनी उत्तरप्रदेशात विकासाचा बुलंद केलेला नारा, उत्तरप्रदेशात वाढलेली जीडीपी, दरडोई उत्पन्नात झालेली घसघशीत वाढ, विकासाच्या राबविलेल्या योजना या सर्व कार्याची परतफेड उत्तरप्रदेशच्या जनतेने योगींना या घवघवीत यशातून केली, असेही ते म्हणाले.
देवेंद्र फडणवीस गोवा यशाचे शिल्पकार
गोव्यामध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आखलेली कुशल रणनीती,केलेले नियोजन, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिलेली कामाची दिशा आणि गोव्याच्या जनतेमध्ये निर्माण केलेला विश्वास हे गोव्यातील भाजपाच्या यशाचे गमक आहे व देवेंद्रजीच खरे यशाचे शिल्पकार आहेत, असेही ॲड. धर्मपाल मेश्राम म्हणाले.