– राज्यात विधानसभेची निवडणूक होणार आहे. या आगामी निवडणुकीसाठी भाजपने रणनिती ठरवली आहे. क्लस्टर चेह-यांचा फार्म्युला भाजप वापरणार आहे. पक्षाच्या अध्यक्षपदाबाबतही महत्वाची अपडेट समोर आली आहे.
भाजपची विधानसभेसाठी रणनीती ठरल्याची माहिती आहे. क्लस्टर चेह-यांचा फार्म्युला भाजप वापरणार आहे. मराठा, ओबीसी आणि आदिवासी नेत्यांवर जबाबदारी दिली जाणार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या सह पंकजा मुंडे, नारायण राणे, आशिष शेलार यांच्यावर मुख्य जबाबदारी दिली जाणार असल्याचं कळतं आहे. मराठा मतदार, ओबीसी मतदार आणि दलित आदिवासी मतदारांना भाजपकडे वळवण्याची रणनीती आहे. देवेंद्र फडणवसींच्या नेतृत्वात चारही नेते काम करणार आहेत. लवकरच चारही नेत्यांच्या यात्रा आणि सभा सुरू होणार आहेत. याच चेह-यांवर विधानसभेचा डाव खेळला जाणार असल्याची माहिती खात्रिलायक सूत्रांनी दिली आहे.
भाजप अध्यक्षपदाबाबत महत्वाची अपडेट
भाजपला राष्ट्रीय अध्यक्ष नवीन वर्षात मिळणार असल्याची माहिती आहे. 2025 च्या जानेवारी महिन्यात नवीन राष्ट्रीय अध्यक्ष पदभार घेणार असल्याची माहिती आहे. महाराष्ट्र विधानसभा निकालानंतर राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया सुरु होणार आहे. नवीन अध्यक्ष निवडीपर्यंत जे. पी. नड्डा अध्यक्ष राहणार आहेत. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक होईपर्यंत पक्षाध्यक्ष बदलाचे कुठलेही संकेत नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.