भाजपाने ७५० पेक्षा अधिक ग्रामपंचायती जिंकल्या

– प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले कार्यकर्त्यांचे अभिनंदन

मुंबई :-राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ७५० पेक्षा अधिक ग्रामपंचायती जिंकत दणदणीत यश मिळवले आहे. या यशाबद्दल भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आहे. या निवडणुकीत भाजपा – शिवसेना आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीने १४०० पेक्षा अधिक जागा जिंकत महाविकास आघाडीचा धुव्वा उडवला आहे. या यशाबद्दल भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश मुख्यालयात सोमवारी मुंबई अध्यक्ष आ.आशीष शेलार,विधान परिषदेतील गटनेते आ.प्रवीण दरेकर, ज्येष्ठ नेते सुनील कर्जतकर आदींच्या उपस्थितीत जल्लोष करण्यात आला.

राज्यात ग्रामपंचायतींची नुकतीच निवडणूक झाली. या निवडणुकीत एकट्या भारतीय जनता पार्टीने ७५० पेक्षा अधिक जागा जिंकत राज्यात आपणच नंबर एक असल्याचे दाखवून दिले आहे, अशी प्रतिक्रिया मुंबई भाजपा अध्यक्ष आ.आशीष शेलार यांनी व्यक्त केली.भाजपा प्रदेश मुख्यालयात झालेल्या विजयोत्सव कार्यक्रमावेळी आ. शेलार पत्रकारांशी बोलत होते. भाजपाचे विधानपरिषदेतील गटनेते प्रवीण दरेकर यांनी सांगितले की, भारतीय जनता पार्टीने नेहमीच विकासाचे सकारात्मक राजकारण केले आहे.या राजकारणाला ग्रामीण भागातील जनतेने अनुकूल कौल दिला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उठसुठ आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणाऱ्यांना जनतेने सणसणीत चपराक दिली आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा देवेंद्र फडणवीस हे मार्गी लावतील,असा विश्वास सामान्य माणसाला वाटतो असे या निवडणुकीतून दिसले,असेही आ. दरेकर यांनी नमूद केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

२६ ऑक्टोबर हा दिवस ‘‘धम्मक्रांती विजय दिन’’ म्हणून साजरा करावा - सर्व वक्त्यांचे एकमुखी आवाहन

Tue Nov 7 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी दिलेली ऐतिहासिक बौद्ध धम्मदीक्षा २६ ऑक्टोबर १९६४ रोजी सर्वोच्च न्यायालयाने सांविधानिकदृष्टया वैध ठरविली. त्यामुळे समस्त बौद्धजनांनी २६ ऑक्टोबर हा दिवस ‘‘धम्मक्रांती विजय दिन’’ म्हणून साजरा करावा, असे आवाहन सर्व वक्त्यांनी आपल्या भाषणातून केले. कर्मवीर हरिदास आवळे बाबू प्रतिष्ठानद्वारे डॉ. आंबेडकर मिशन सभागृहात ‘‘बौद्ध धम्म समारोहाच्या वैधतेसंबंधी सर्वोच्च […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com