– नागरिकांनी कायदया विषयी सल्यासंदर्भात वकिलांसोबत चर्चा करून आपल्या समस्येचे निरीक्षण करावे ! ॲड गिरीश खोरगडे
नागपूर :- भारतीय जनता पार्टी तर्फे पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्रातील गितानगर, झिंगाबाई टाकळी परिसरात ‘निःशुल्क कायदा सल्ला व मार्गदर्शन केंद्रची’ सूरूवात करण्यात आली. नुकत्याच झालेल्या उद्घाटन कार्यक्रमात रविवारी २९ डिसेंबर रोजी माजी आमदार सुधाकर देशमुख यांच्या शुभहस्ते व ॲड. उदय डबले, सुधाकर कोहळे, चरणसिंग ठाकुर, भुषण शिंगणे, संदीप जाधव, विनोद कन्हेरे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन संपन्न झाले. याप्रसंगी असंख्य लोकांच्या कायद्याच्या अपूऱ्या ज्ञानामुळे किंवा योग्यवेळी कायदेशिर सल्ला न घेतल्यामुळे समाजात वाद-विवाद व तंटे निर्माण होत असतात या वादांचा परिणाम नाहक पीढी दर पीढीला भोगावा लागतो. मात्र योग्य कायदेशिर सल्ला व मार्गदर्शनामुळे समाज शिक्षीत तर होतोच पण आपसातील वाद-विवाद व तंटे दुर होतात. याच उद्देशाने भारतीय जनता पार्टी तर्फे निःशुल्क ‘कायदा सल्ला व मार्गदर्शन केंद्र’ सुरु करण्यात आले आहेत. यावेळी ‘कायदा मार्गदर्शन व सल्ला केंद्रामध्ये’ कौटुंबिक वाद, हिस्से-वाटी संबंधीत वाद, विक्रीपत्र, बक्षीसपत्र, मृत्यूपत्र संबंधीत वाद, धर्मदाय संस्थेतील वाद, चेक बाउंसचे वाद, वारस हक्क संबंधीत वाद, फौजदारी प्रकरणातील वाद, विवीध प्रशासकिय विभागांमध्ये कामकाजा संबंधीत वाद,जमीन अधिग्रहण संबंधीत वाद, तहसिलदार, एस.डी.ओ. / एस.एल.आर. यांचे समोरील वाद, विमा कंपन्यांच्या संबंधीत वाद, अपघाता संबंधीत प्रकरणे, महानगरपालिका, नगर भूमापन अधिकारी यांचे समोरील वाद, बँकेच्या कर्जासंबंधी वाद, मुस्लिम कायद्याच्या अंतर्गत येणारे वाद, ऑनलाईन फसवणुकीचे वाद, कामगारांच्या समस्या, नागरिकांना दैनंदिन जीवनात येणाऱ्या कायदेशिर अडचणींचे अनुभवी वकीलांमार्फत योग्य सल्ला देवून निरसन करण्याचा प्रयत्न व कायदा मार्गदर्शन व सल्ला केंद्राद्वारे करण्यात आले. ‘कायदा सल्ला व मार्गदर्शन केंद्रात ईच्छुक नागरीकांनी ९८२३३-५५५०८ या क्रमांकावर संपर्क साधुन वकीलनां सोबत वेळ निश्चित करून त्याची भेट घ्यावी व वकीलांसोबत चर्चा करून आपल्या समस्येचे निरसन करावे. अँड. गिरीश खोरगडे प्रशासकीय समन्वय प्रमुख भाजपा नागपूर महानगर यांनी आवाहन केले आहे.