वाढीव मालमत्ता कराला ब्रेक न लावल्यास भाजप तर्फे तीव्र आंदोलनाचा ईशारा

कामठी :- कामठी नगर परिषद हद्दीत येणाऱ्या घर करात अतिशय वाढ करण्यात आली असून शिक्षण कर 1000 च्या वर, वृक्षकर व घनकचरा करात 400 ते 1000 तसेच अग्निशमन कर 500 ते 1000 रुपयांपर्यंत वाढ केली आहे. ही एकूण करवाढ सर्वसामान्य नागरिकांना परवडणारे नसून सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेर आहे. तसेच 21 डिसेंबर 2021 ला कामठी नगर परिषद मध्ये झालेल्या विशेष बैठकीत भाजप,बरीएम तसेच शिवसेना च्या नगरसेवकांनी विरोध दर्शविला होता व सर्वसंमतीने सदर विषय रद्द करण्यात आला होता तसेच कोरोनाच्या प्रादुर्भावाला लक्षात घेत ह्या विषयाला पुढे वाढवण्याची मंजुरी देण्यात आली तरीसुद्धा मालमत्ता करवाढ करण्यात आली वास्तविकता नगर परिषद सभेच्या सभागृहात घेतलेले विषय मंजूर वा रद्द झाल्यानंतर नगर परिषद सदस्यांची कच्या प्रोसिडिंग मध्ये स्वाक्षरी घ्यायला पाहिजे पण तसे होत नाही उलट एका रजिस्टर मध्ये नगर परिषद सदस्यांची हजेरी लावण्यात येते तेव्हा या वाढीव घरकर संदर्भात एक समिती गठित करून पुनर्विचार करण्यात यावा व घरकर कमी करण्यात यावा असे न केल्यास भाजप तर्फे नगर परिषद विरोधात तीव्र आंदोलन पुकारण्यात येईल असा ईशारा भाजप शहराध्यक्ष व माजी नगरसेवक संजय कनोजिया यांनी आज भाजप कार्यालयात आयोजित पत्रपरिषदेत व्यक्त केले.

याप्रसंगी माजी नगरसेवक लालसिंग यादव, माजी नगरसेवक प्रतीक पडोळे, माजी नगरसेविका सुषमा सीलाम, विनोद संगेवार, जितेंद्र खोब्रागडे, राजु बावनकुळे, खुल्लरकर आदी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

The “Third Eye” Photography Exhibition from November 4 to 6 at SCCZ

Thu Nov 3 , 2022
Nagpur :- Three days long photography exhibition “Third Eye” is being organized by the noted photographer of Nagpur, Baburao Chingalwar, at the South Central Cultural Zone Nagpur from the fourth of November onwards. The exhibition will be inaugurated at the hands of the Director of the South Central Cultural Zone, Dr. Deepak Khirwadkar. Chingalwar is a noted photographer enriched with […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com