भाजपा विधि आघाडी दक्षिण नागपूरची कार्यकारिणी घोषित

नागपूर :- शनीवार दि. ८ जुलै २०२३ रोजी भाजपा दक्षिण नागपूर विधी आघाडीची घोषणा करण्यात आली. विधी आघाडी चे कार्य प्रत्येक विधानसभा क्षेत्रात वाढविण्याकरीता मंडळ स्तरावर विधी आघाडी स्थापन करण्याचे निर्देश विधी आघाडी नागपूर शहर अध्यक्ष अँड. परीक्षेत मोहिते यांनी दिले, त्या अनुषंगाने दक्षिण नागपूर विधी आघाडीचे अध्यक्ष अँड. शैलेश हेमके यांनी कार्यकारिणीची घोषणा केली. त्यामध्ये अँड. अमोल भिसे, अँड. मंगेश तलवारकर, अँड. निलेश ठेंगरे, अँड. विवेक थोटे यांना महामंत्री, अँड. आनंद गाडगे यांना संपर्क प्रमुख, अँड. शैलेश कोल्हे यांना प्रसिद्धी प्रमुख नियुक्त करण्यात आले. तसेच १७ उपाध्यक्ष, ११ मंत्री व कार्यकारनीमध्ये १४४ विधीज्ञ यांची नियुक्ती करण्यात आली व ३०० लोकांच्या उपस्थितीत समक्ष कार्यकारिणीची घोषणा केली .

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. मोहन मते उपस्थित होते  त्याच प्रमाणे माजी आमदार गिरीश व्यास, प्रभारी, भाजपा दक्षिण नागपुर भोजराज डूंबे, संघटन मंत्री विष्णु चांगदे, अध्यक्ष, भाजपा दक्षिण नागपुर देवेन दस्तुरे, माजी प्रदेश सचिव अँड. उदय डबले, शहर अध्यक्ष अँड. परिक्षीत मोहिते, शहर उपाध्यक्ष अँड. कांचन करमरकर, शहर उपाध्यक्ष अँड. प्रफुल्ल मोहगावकर, अँड. नितीन तेलगोटे, अँड. प्रकाश जैसवाल, अँड. गिरीश खोरगडे, अँड. रितेश कालरा प्रामुख्याने हजर होते.

कार्यक्रमामध्ये मा. आमदार मोहन मते, माजी आमदार  गिरीश व्यास, अँड. उदय डबले व अँड. नितीन तेलगोटे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची प्रस्तावना अँड. शैलेश हेमके यांनी मांडली तसेच पाहूणन्यांच्या हस्ते दक्षिण नागपुर येथील भाजपा विधी आघाडी च्या वेगवेगळया विधिज्ञांची यादी प्रकाशित करण्यात आली. अँड. शैलेश हेमके यांनी दक्षिण नागपूर मध्ये भविष्यात विधी मार्गदर्शन केंद्र उघडून जनते मध्ये वेगवेगळ्या कायदे बाबत मार्गदर्शन करून जनतेची सेवा करण्याचे आश्वासन दिले. या केंद्रा मध्ये गरीब असहाय जनतेस मोफत कायदे विषयक सल्ला, मार्गदर्शन व शिक्षण देऊन न्यायालयात वाढत चाललेल्या कोर्ट केसेसला आळा घालण्याचा प्रयत्न करण्यात येईल. असा उद्देश्य व्यक्त केला.

कार्यक्रमाचे मंच संचालन अँड. अमोल भिसे यांनी केले व आभार प्रदर्शन अँड. मंगेश तलवारकर यांनी केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

SIX HOSPITALS OF VIDARBHA REGION EMPANELED TO PROVIDE CASHLESS TREATMENT FOR VETERANS

Mon Jul 10 , 2023
Nagpur :- In a commendable initiative, six reputed hospitals have been approved for empanelment with ECHS (Ex Servicemen Contributory Health Scheme) by MoD to offer cashless medical treatment to the valiant veterans who selflessly served our nation. This significant step aims to honour and support those individuals who dedicated the prime of their lives in protecting our country and ensuring […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!