नागपूर :- वकिल आघाडी चे कार्य प्रत्येक विधानसभा क्षेत्रात वाढिवण्याकरीता मंडळ स्तरावर वकील आघाडी ची स्थापन करण्याचे निर्देश विधी आघाडी नागपूर शहर अध्यक्ष ऍड परीक्षेत मोहिते यांनी दिले, त्या अनुषंगाने मध्य नागपूर वकील आघाडीचे अध्यक्ष ऍड. जितेन्द्र प्रताप यादव यांनी कार्यकारिणीची घोषणा केली. विशेष म्हणजे नागपुर इतिहासात पहिल्यांदाच मध्य नागपुर आघाडीची एवढ्या मोठ्या संख्येनी घोषणा करण्यात आली. यावेळी अध्यक्ष ऍड. जितेन्द्र प्रताप यादव यांनी ३० वकिलांना विविध पद देऊन नियुक्ती पत्र बहाल केले त्यामध्ये ऍड. चारुदत्त वासाडे, ऍड. राहुल काळकर, ऍड. प्रेमा दुरुगकर, ऍड. कौस्तुभ शोभणे यांना महामंत्री, ऍड. सिद्धार्थ राऊत यांना संपर्क प्रमुख, ऍड. ताहीर खान यांना प्रसिद्धी प्रमुख व अन्य लोकांना नियुक्त करण्यात आले व १५० लोकांचा समक्ष कार्यकारिणीची घोषणा केली .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. प्रवीण दटके उपस्थित होते व त्याच प्रमाणे आमदार विकास कुंभारे, माजी आमदार गिरीश व्यास, राम आंबुलकर महामंत्री नागपूर शहर, सुनील मित्रा (ओ.एस. डी. डिप्टी सी. एम.), किशोर पलांदुरकर अध्यक्ष नागपूर शहर, बंडू राऊत निवडणुक प्रमुख मध्य नागपुर, माजी प्रदेश सचिव ऍड. उदय डबले, शहर अध्यक्ष ऍड. परिक्षीत मोहिते, शहर उपाध्यक्ष ऍड. कांचन करमरकर, शहर उपाध्यक्ष ऍड प्रफुल्ल मोहगावकर, ऍड. नितीन तेलगोटे, ऍड. प्रकाश जैसवाल, ऍड. नरेन्द्र जेठा, ऍड. शशांक चौबे प्रामुख्याने हजर होते.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राजेन्द्र धकाते, सुबोध आचार्य, विनायकराव डेहनकर, ब्रिजभुषण शुक्ला, ऍड. सारंग देव, ऍड. स्वप्नील डुबेवार, ऍड गिरीश खोरगडे, ऍड. नचिकेत व्यास, ऍड. मंगलेश दूरुगकर, नगर विधी महामंत्री ऍड. अमोल कावरे, ऍड. संकेत यादव, ऍड. अमोल बोरकर, ऍड. रितेश कालरा हे उपस्थित होते.
कार्यक्रमामध्ये आमदार प्रविण दटके, आमदार विकास कुंभारे, माजी आमदार गिरीश व्यास, ऍड. उदय डबले व ऍड.परिक्षीत मोहिते, ऍड. नितीन तेलगोटे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची प्रस्तावना ऍड. जितेन्द्र यादव यांनी मांडली. त्यानी मध्य नागपूर मध्ये भविष्यात विधी मार्गदर्शन केंद्र उघडून जनते मध्ये कायदे बाबत शिक्षण व मार्गदर्शन करून जनतेची सेवा करण्याचे आश्वासन दिले. या केंद्रा मध्ये गरीब असहाय जनतेस मोफत कायदे विषयक सल्ला, मार्गदर्शन व शिक्षण देऊन न्यायालयात वाढत चाललेल्या कोर्ट केसेसला आळा घालण्याचा प्रयत्न करण्यात येईल. असा उद्देश्य व्यक्त केला.
कार्यक्रमाचे मंच संचालन ऍड. प्रेमा दुरूगकर व ऍड. कौस्तुभ शोभणे यांनी केला व आभार प्रदर्शन ऍड. कौस्तुभ शोभणे यांनी केले.