गडचिरोली :- चांद्रयान ३ मोहीम यशस्वी झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘इस्रो’ च्या वैज्ञानिकांचे अभिनंदन केले आहे. आज गडचिरोली येथे ‘चांद्रयान’चे यशस्वी लँडिंग होत असतानाचा क्षण अनुभवला. ‘ समस्त भारतीयांसाठी हा अभिमानाचा आणि गौरवाचा क्षण आहे. या मोहिमेसाठी अहोरात्र कष्ट घेतलेल्या ‘इस्रो’ च्या वैज्ञानिकांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो ‘ असे बावनकुळे यांनी पत्रकात म्हटले आहे.
चांद्रयान ३ मोहीम यशस्वी झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात बुधवारी जल्लोष करण्यात आला . प्रदेश सरचिटणीस संजय केनेकर, प्रदेश चिटणीस सुरेश बनकर , किरण पाटील, रामेश्वर भांदरगे, डॉ . सुभाष कदम, एस.एम. खान, प्रदेश कार्यालय सहसचिव भरत राऊत आदी यावेळी उपस्थित होते.