भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांना डावलण्यात येत आहे

– पत्रपरिषदेत भा.ग्रा.पं.जिल्हाध्यक्ष राजेश ठाकरे यांचा आरोप

– जिल्हा नियोजन समितीच्या नियुक्तीमध्येही डावलले

– रामटेक विधानसभा क्षेत्रातील भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते नाराज

रामटेक :- रामटेकच्या आमदारांकडुन सातत्याने शासकीय समीतींच्या नियुक्ती संदर्भात रामटेक विधानसभा क्षेत्रातील योग्यता असलेल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना टाळल्या जात असल्याने समस्त भारतीय जनता पार्टी रामटेक विधानसभा क्षेत्रातून आमदारांच्या संदर्भात मोठ्या प्रमाणावर असंतोष निर्माण झालेला आहे जर भाजपा व शिवसेना शिंदे गट युती चा धर्मनुसार समान सन्मान या आधारावर ठरलेलं असताना सुद्धा भाजपाच्या कुठल्याही यादीवर स्थानिक आमदार हे गांभीर्याने लक्ष देत नसल्याने तसेच परस्पर यादीमध्ये फेरबदल करून वरिष्ठ स्तरावर भाजपाच्या स्थानिक पदाधिकारी कार्यकर्त्यांना तसेच नेत्यांना पालापाचोळ्या समजल्या जात असल्याचा आरोप काल दि. १३ जुलै ला होटल दिप येथे झालेल्या पत्रपरिषदेत भाजपा ग्रामविकास पंचायतराज जिल्हाध्यक्ष राजेश ठाकरे यांनी केला.

पुढे बोलतांना ठाकरे म्हणाले की नुकत्याच जाहीर झालेल्या संजय गांधी निराधार समितीवर तसेच इतर समित्यांवर रामटेक व पारशिवनी तालुक्यामध्ये ९० टक्के वाटा काही ठिकाणी शंभर टक्के वाटा फक्त आणि फक्त शिंदे गटाचा आहे त्यामुळे सुद्धा भाजपचा कार्यकर्ता अस्वस्थ आहे. म्हणून भाजपच्या कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या सन्मानार्थ वरिष्ठ नेत्यांना तसेच राज्य पातळीवर सुद्धा भाजपा रामटेक विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या सन्मान डावलल्या जात असल्याचं मेसेज हा राज्यपातळीवर जावा याकरिता ही पत्रपरिषद घेण्यात आलेली असल्याचे सांगत ठाकरे यांनी काही आवाहने पत्रपरिषदेत ठेवली. त्यामध्ये स्थानीक आमदार यांच्या मार्फत जेवढ्या समित्या गठित झालेले आहेत त्या तात्काळ रद्द करून नव्याने नियुक्त्या करून प्रत्येक तालुक्यात भाजपाला किमान ६० ते ७० टक्के वाटा देण्यात यावा. भाजपाचे सरपंच ज्या ज्या ठिकाणी आहेत त्या त्या ठिकाणी निधी वाटपात सुद्धा भाजपच्या सरपंचांना व संबंधित गावांना डावलले जात आहे.

तसेच अति महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जो खरोखर मोठ्या प्रमाणावर बीजेपी कार्यकर्त्यावर झालेला अन्याय म्हणजेच नुकत्याच भारतीय जनता पार्टीच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांच्या जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य पदाच्या नियुक्ती रद्द करून काँग्रेसच्या दोन पदाधिकाऱ्यांना अर्थात काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य शांता कुमरे तसेच हर्षवर्धन निकोसे माजी जिल्हा परिषद सदस्य यांना घेण्यात आले. यावरून असं निदर्शनास येत आहे की जाणीवपूर्वक बीजेपी पदाधिकाऱ्यांवर अन्याय कसा होईल याचा प्रयत्न सातत्याने स्थानीक आमदारांकडून होत आहे त्यामुळे नव्याने नियुक्ती झालेल्या शांता कुमरे तसेच हर्षवर्धन निकोसे यांच्या नियुक्ती रद्द करण्यात याव्या व त्या ठिकाणी रुपराव शिंदे तसेच संदीप सरोदे यांना परत पद बहाल करण्यात यावं असे राजेश ठाकरे यांनी आवाहन करीत सांगीतले. त्यांना विश्वासात न घेता त्यांच्यावर जो विश्वासघात झाला त्यामुळे मोठ्या प्रमाणावर भाजपा नागपूर जिल्ह्यातील कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान दुखावल्या गेलेला आहे याचा फरक येणाऱ्या निवडणुकांवर पडण्याची दाट शक्यता असल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर तात्काळ गांभीर्याने विचार करून भाजपा कार्यकर्त्यांना भविष्यात सन्मान कसा भेटेल याकरता लक्ष घालावे अशा प्रकारची विनंती सुद्धा या पत्र परिषदेच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. यावेळी उपस्थितांमध्ये भाजपा ग्रामविकास पंचायतराज जिल्हाध्यक्ष डॉ राजेश ठाकरे, पंचायत समीती उपसभापती नरेंद्र बंधाटे, माजी न.प. उपाध्यक्ष अलोक मानकर, गोपी कोल्हेपरा , तेजपाल सोलंकी, रामानंद अडामे, प्रभाकर खेडकर, तसेच भाजपा चे ज्येष्ठ सदस्य चंद्रशेखर माकडे ,उमाकांत पोफळी , तीमाझी मेंघरे , सरदार शेख, धनंजय तरारे , मनोज मानकर आदी उपस्थित होते.

भाजप च्या जेष्ठ लोकांना डावलले

पुढील चार-पाच दिवसात शांता कुंबरे जिल्हा परिषद सदस्य काँग्रेस यांच्या प्रवेश होण्याचे बोलले जात आहे प्रवेशाचा आम्हाला स्वागत आहे परंतु प्रवेशाच्या अगोदर भाजपाच्या ज्येष्ठ लोकांना टाळणे तेही त्यांना विश्वासात न घेता टाळणे त्यांचे सदस्यत्व रद्द करणे याकरिता रामटेक चे आमदार यांच्या कामकाजाचा निषेध म्हणून ही पत्रपरिषद घेतली असल्याचे याप्रसंगी राजेश ठाकरे यांनी सांगीतले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

धर्म की रक्षा के लिए कमर कसना चाहिए - आचार्यश्री सुवीरसागर

Fri Jul 14 , 2023
– जैन समाज ने निकाला विशाल शांतिमार्च नागपुर :- सकल जैन समाज द्वारा गुरुवार को गांधी पुतला सेंट्रल एवेन्यू से जैन आचार्यश्री कामकुमारनंदी गुरुदेव के हत्या के विरोध शांतिमार्च निकाला गया। जैन आचार्यश्री सुवीरसागर गुरुदेव के सानिध्य में विशाल शांतिमार्च निकल कर सेंट्रल एवेन्यू होते हुए संविधान चौक पहुंचा। शांतिमार्च में जैन समाज महिला, पुरुष, बच्चे बड़ी संख्या में उपस्थित […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!