संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कन्हान- भारतीय जनता पार्टी कन्हान शहर तर्फे बौद्ध पौर्णिमे निमित्त कन्हान येथील गणेश नगर सिद्धार्थ कॉलोनी मधल्या विहारत बौद्ध जयंती साजरी करण्यात आली.बौद्ध विहारात माल्यार्पण करुण पंचशील ग्रहण करण्यात आले आणि विहारतील सदस्याना आणि नागरिकांना शुभेच्छा देण्यात आल्या.
कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष संजय रंगारी यांनी केले.आभार प्रदर्शन ऋषभ बावनकर यांनी केले.
यावेळी प्रमुख्याने रामभाऊ दिवटे महामंत्री भाजपा ओबीसी आघाडी नागपुर जिल्हा, डॉ मनोहर पाठक अध्यक्ष भाजपा कन्हान शहर, रिंकेश चवरे जिल्हा उपाध्यक्ष भाजपा अनुसूचित जाती मोर्चा नागपुर ग्रा., संजय रंगारी अध्यक्ष भाजपा अनुसूचित जाति मोर्चा नागपुर ग्रा., राजेन्द्र शेन्द्रे भाजपा गट नेते कन्हान न प, संगीताताई खोब्रागडे नगरसेविका कन्हान न प, सुषमाताई चोपकर नगरसेविका कन्हान न प, भारतजी साळवे जेष्ठ नागरिक, सुनील लाडेकर महामंत्री भाजपा कन्हान शहर, सुषमा मस्के महामंत्री भाजपा महिला आघाडी कन्हान शहर, प्रतीक्षा चवरे सदस्य भाजपा महिला आघाडी कन्हान शहर, कामेश्वर शर्मा उपाध्यक्ष भाजपा पारशिवनी तालुका, विक्की सोलंकी अध्यक्ष भाजपा युवा मोर्चा कन्हान शहर, रंजीत शिंदेकर, संजय चोपकर, उपासराव खोब्रागडे, रुषभ बावनकर, शैलेश शेळके, अमन घोडेस्वार, मयूर माटे, रवी महाकाळकर इत्यादि उपस्थित होते.