नागपूर – कर्नुल येथे संघ कार्यालयावर झालेल्या भ्याड हल्याच्या जाहीर निषेध व्यक्त करण्याकरीता नागपुरात भारत माता चौक येथे भाजयुमोतर्फे भाजयुमो प्रदेश सचिव राहुल खंगार यांच्या प्रमुख उपस्थितीत व भाजयुमो शहर अध्यक्ष पारेंद्र (विक्की) पटले यांच्या नेतृत्वात निदर्शने करण्यात आले.
यावेळी प्रामुख्याने शहर महामंत्री सचिन करारे, दिपांशु लिंगायत, अमोल तिडके, संपर्क मंत्री मनिष मेश्राम, मंडळ अध्यक्ष बादल राऊत, निलेश राऊत, पंकज सोनकर, शहर संपर्क प्रमुख सचिन सावरकर, शहर प्रसिद्धी प्रमुख प्रसाद मुजुमदार, सह-प्रमुख मनमित पिल्लारे, गौरव हरडे, रितेश पांडेय, अक्षय ठवकर, अथर्व त्रिवेदी, रितेश पांडे, अनुप साळवे, राहुल वाटकर, रोहीत सहारे, समीर मांडले, अमित पांडे, हर्ष डोर्लिकर, पवन महाकाळकर, प्रविण रेवतकर, स्वप्निल फुलसुंगे, सोनु मानकानी, अमित सलामे, आकाश गुप्ता, गुड्डू पांडे, गोविंदा काटेकर, हर्षल वाडेकर, देवा वर्मा उपस्थित होते.