नागपूर :- भारतीय जनता पार्टी नागपूर शहर तर्फे विधानपरिषदेचे नवनिर्वाचित सदस्य आमदार संदीप जोशी यांचा गुरुवारी (ता. २७) सत्कार करण्यात आला.
शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहामध्ये आयोजित कार्यक्रमात राज्याचे महसूल मंत्री तथा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भव्य पुष्पहार घालून आमदार संदीप जोशी यांचे अभिनंदन केले.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे विदर्भ संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, आमदार कृष्णा खोपडे, आमदार प्रवीण दटके, प्रदेश उपाध्यक्ष प्रा. संजय भेंडे, नागपूर शहराध्यक्ष जितेंद्र (बंटी) कुकडे, भाजपा जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुधाकर कोहळे, माजी आमदार सुधाकर देशमुख उपस्थित होते.
आमदार तथा नागपूर शहराचे माजी महापौर संदीप जोशी यांनी २१ मार्च रोजी विधानपरिषदेचे सदस्य म्हणून शपथ ग्रहण केली. त्यानंतर नागपूर शहरात आगमनानंतर भारतीय जनता पार्टीतर्फे त्यांचे अभिनंदन करीत सत्कार केला.