संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 25: – आज भारतीय जनता पार्टी कामठी तालुका तर्फे महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात पेट्रोल डिझेल वरील राज्याने टॅक्स कमी करावा याकरिता “एल्गार आंदोलन” करण्यात आले. याप्रसंगी कामठी तहसील कार्यालय समोर राज्याच्या महाविकास आघाडी सरकार विरोधात नारेबाजी करण्यात आले. तसेच नायब तहसीलदार आर उके यांना सामूहिक निवेदन देत पेट्रोल डिझेल वरील टॅक्स राज्याने कमी करावा अशी मागणी करण्यात आली.
याप्रसंगी भाजपा नेते व माजी जी प सदस्य अनिल निधान, भाजप तालुकाध्यक्ष किशोर बेले, भाजप कामठी शहराध्यक्ष संजय कनोजिया,माजी नगरसेवक कपिल गायधने, पंकज वर्मा, गादा ग्रा प सदस्य सचिन डांगे, विनोद वाठ, योगेश डाफ,सचिन घोडमारे, गौरव ताकत, अविनाश पांडे, असफाक , यासह इतर प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते..