संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- गांधी घराण्यातील नेता पूजनाची परंपरा नाना पटोले पर्यंत पोहोचले असून पराजयातही विजयाचा उन्मादाने उन्मत झालेले कांग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी चक्क कार्यकर्त्या कडून पाद्यपूजा करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार पुरोगामी महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला काळिमा फासणारा असून नाना पटोलेच्या या कृतीचा भाजप तर्फे जाहीर निषेध करण्यात येत आहे तसेच या कृतीचे जाहीर प्रदर्शन करणाऱ्या नाना पटोलेंनी ताबडतोब पदाचा राजीनामा देऊन राजकारणातून संन्यास घ्यावा अशी मागणी आज बुधवार दिनांक १९/०६/२०२४ ला भाजपा कामठी विधानसभेच्या वतीने तहसील कार्यालय कामठी शहर येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले च्या निषेधार्थ आंदोलनातून करण्यात आले.
हे आंदोलन भाजप जिला महामंत्री अनिल निधान,महिला मोर्चा जिला अध्यक्ष अनुराधा आमीन आणि युवा मोर्चा जिला अध्यक्ष आशीष फुटाने यांच्या नेतृत्वात करण्यात आले. याप्रसंगी भाजप जिल्हा महामंत्री अनिल निधान यांनी सांगितले की देशाच्या राजकारणात कांग्रेसने व्यक्तिपूजेची परंपरा सुरू केली. गांधी घराण्याचे हुजरे यामध्ये आघाडीवर राहिले याच परंपरेचा शिरकाव कांग्रेस मध्ये तळागाळात पोहोचला असून कांग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे चिखलाने माखलेले पाय चक्क कार्यकर्त्यांनी पाण्याने धुतल्याचा प्रकार अकोला जिल्ह्यातील वाडेगाव येथे समोर आला.पुरोगामी महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला बट्टा लावणाऱ्या या कृतीबद्दल प्रायश्चित म्हणून नाना पटोले यांनी राजकीय संन्यास घेऊन बुवाबाजी करावी व कांग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावर पाणी सोडावे अन्यथा त्यांच्या विरोधात निषेध दर्शविण्यात येत आहे.
याप्रसंगी युवा मोर्चा प्रदेश सचिव कपिल गायधने,लाला खंडेलवाल, श्रावण केळझरकर, संपर्क प्रमुख पंकज वर्मा, कामठी ग्रामीण मंडळ अध्यक्ष उमेश रडके,कामठी शहर अध्यक्ष चंद्रशेखर तुप्पट,ग्रामीण सरपंच -नरेंद्र धानोले,सचिन डांगे,योगेश डाफ,लक्ष्मण करारे,शहर महामंत्री-विजय कोंडूलवार, प्रभा राऊत, नरेश कलसे,ग्रामीण महामंत्री सचिन घोडमारे, मनीष मेश्राम,युवा मोर्चा कामठी ग्रामीण अध्यक्ष किरण राऊत,युवा मोर्चा शहर अध्यक्ष कुणाल सोलंकी,युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष पिक्कूभैया यादव,मंत्री रोहन बिल्लरवान,येरखेडा नेते उन्मेष महल्ले,युवा मोर्चा कामठी शहर महामंत्री शानू ग्रावकर, रजत यादव, यश कोंडे, गोलू उके,युवा मोर्चा कामठी ग्रामीण महामंत्री – कुबेर महल्ले, महिला आघाडी कामठी शहर अध्यक्ष. कुंदा रोकडे, महिला ग्रामीण पदाधिकारी – नंदा तुरक, गीता जुमेदार, रेखा दुनेदार, महिला आघाडी महामंत्री – गायत्री यादव, रोशनी कानफाडे, नंदा बाराई,उपाध्यक्ष कल्पना मुंडुराव, गीता मंथनवर, कामठी शहर ओबीसी आघाडी अध्यक्ष प्रमोद कातुरे, सोशल मीडिया व आयटी सेल संयोजक रोहित तरारे, प्रशांत पाटील, सोनू अमृतकर, सत्यम शर्मा, पियुष धनवटे, हर्षल लिंबाचिया, लोकेश माळोदे, कामठी ग्रामीण अल्पसंख्याक अध्यक्ष अफसर खान, जितेंद्र डाफ, तुषार ढबाले, आदित्य वर्मा, प्रतीक पडोले, नामदेवजी, जितू डाफ, गोलू वानखेडे, सुरेश ढोले, सेवक उईके, रितेश महल्ले, स्वप्नील शिवणकर, दिवांशू वाठ, प्रविण आगासे व युवा आणि महिला उपस्थित होते.