नवी दिल्ली :- भारतीय राजकारणातील महान विचारवंत आणि माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांची 100 वी जयंती महाराष्ट्र सदन येथे आज साजरी करण्यात आली.
कॉपरनिकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश आडपवार यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
यावेळी सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार तसेच उपस्थित कर्मचाऱ्यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले.