नवीन वर्षात पोलीस दलात मोठा बदल, महासंचालकपदासाठी फडणवीस यांच्या मर्जीतील अधिकारी

मुंबई :- महाराष्ट्र पोलीस दलात नवीन वर्षांत मोठे बदल होणार आहे. राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ ३१ डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होत आहे. रजनीश शेठ यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे नवे अध्यक्ष करण्यात आले आहे. यामुळे आता राज्याच्या पोलीस दलाचे नेते कोण होणार? हे नवीन वर्षांत ठरणार आहे. राज्याच्या पोलीस महासंचालकपदासाठी कोणाची नियुक्ती करावी? यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात बैठक झाली. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी रश्मी शुक्ला यांच्या नावाचा आग्रह धरला आहे. महासंचालक पदासाठी मुंबईचे आयुक्त विवेक फणसळकर हे स्पर्धेत आहेत.

रश्मी शुक्ला यांची नियुक्ती होण्याची शक्यता

राज्याचे गृहखाते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. रश्मी शुक्ला या देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील अधिकारी म्हणून ओळखल्या जातात. त्यामुळे महासंचालकपदासाठी त्यांचे पारडे जड आहे. आगामी लोकसभा निवडणूक विचारात घेता शुक्ला यांच्या गळ्यात महासंचालकपदाची माळ पडणार असल्याची चर्चा आहे. परंतु मुंबईला आणि राज्याच्या पोलीस दलास नव वर्षात नवे नेतृत्व मिळणार आहे. लोकसभा निवडणुकीपुर्वी हे निर्णय होणार आहे. मुंबईच्या आयुक्तपदी जगजीत सिंह यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नागपूर शहरात खून आणि इतर गंभीर गुन्हे वाढले, २०२२ च्या तुलनेत २०२३ चे चित्र वाईट

Sat Dec 30 , 2023
नागपूर :- गृहमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शहरात २०२२ या वर्षाच्या तुलनेत वर्ष २०२३ मध्ये खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, चोरीसह इतरही काही गंभीर गुन्हे वाढले आहेत. परंतु गेल्या आठ वर्षांची सरासरी दाखवत गुन्हे कमी झाल्याचा दावा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केला आहे. पोलीस भवन येथे शुक्रवारी झालेल्या अनौपचारिक चर्चेत पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, २०२२ मध्ये शहरात गंभीर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!