अमरदिप बडगे
गोंदिया – गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील कवलेवाडा जिल्हा परिषद क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्य किरण पारधी काल 20 जून 2022 रोजी यांनी ग्राम कवलेवाडा येथे 40 लक्ष रुपयाच्या विविध कामांचे भूमिपूजन केले यावेळी पंचायत समिती सदस्य जितेंद्र चौधरी, तानेश्वर रहांगडाले सरपंच कवलेवाडा
जितेश बोदेले ग्रा.प.सदस्य,सिमाबई बिसेन, इंदुबाई पारधी, सुशीलाबाई पारधी,निर्मला कटरे ताई, दिलीप भैरम,एस.जे.पटले ग्रामसेवकछबीलाल पारधी परिचर सेवकराम भैरम, झनकलाल बिसेन,आदी लोग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्र शासन ग्राम विकासाच्या उद्देशाने विविध योजना राबवित आहेत यामधून महाराष्ट्र रोजगार हमी योजना ही राज्यात अव्वल असून ग्रामविकासात सिमेंट रस्ते, मातोश्री पांदन रस्ते, नाली बांधकाम, व इतर विकासाची कामे आहेत तरी शासनाकडून महाराष्ट्र रोजगार हमी योजनेला बळकत करून राज्यात उत्कृष्ट क्रमांकावर राहावी या उद्देशाने महाराष्ट्र रोजगार हमी योजनेला दर्जेदार विकासमुक्त कामे द्यावे अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य किरणकुमार पारधी यांनी केली आहे.