वाडी :- सोनेगाव आणि ऑर्डनन्स फॅक्टरी डिफेन्स यांना जोडणारा सिमेंट रस्ता लवकरच बांधण्यात येत असल्याने ग्रामस्थ आनंद व्यक्त करत आहेत. गुरुवारी या सिमेंट रास्ता बांधकामाचे भूमिपूजन भारती पाटील, शिक्षण व अर्थशास्त्र समितीच्या माजी सभापती जि.प.नागपूर यांच्या हस्ते व रेखा वरठी, माजी सभापती प.स.नागपुर, सरपंच तेजस्विनी धुर्वे, उपसरपंच कृष्णा सरीन यांच्या उपस्थितीत करण्यात आले. आयुध निर्माणी अंबाझरी अंतर्गत येणाऱ्या या ठिकाणी पक्क्या रस्त्याअभावी तसेच डिफेन्सशी निगडीत जवळपास सर्वच कामे विशेषत: पावसाळ्यात होत असल्याने ग्रामस्थ, विद्यार्थी व व्यावसायिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते.
यापूर्वीही अनेकवेळा या समस्येकडे लक्ष वेधून आयुध निर्माणी प्रशासनाकडे केवळ सार्वजनिक हितासाठी बांधकामे करण्याची परवानगी मागितली होती. नुकतेच या भागातील जि.प.सदस्या भारती पाटील व सोनेगाव निपाणी सरपंच तेजस्विनी धुर्वे, उपसरपंच कृष्णा सरीन, सामाजिक कार्यकर्ते अनिल पाटील यांनी आयुध निर्माणी अंबाझरीचे वरिष्ठ महाव्यवस्थापक राजीव गुप्ता यांची भेट घेऊन जि.प.द्वारे आर्थिक मदत केवळ रस्ता बांधकामासाठी मिळाली आहे, जनहितासाठी परवानगी द्यावी अशी विनंती केली.परिस्थिती ओळखून महाव्यवस्थापक राजीव गुप्ता यांनी या रस्त्याच्या कामाला परवानगी दिली. या परवानगीची माहिती ग्रामस्थ व गावात मिळताच आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
जिल्हा नागरी सुविधा योजने अंतर्गत सिमेंट रस्ता कार्य निर्माण करण्यासाठी निधी उपलब्ध होताच शुक्रवारला विधिवत रस्ता निर्माण कार्याचे भूमिपूजन सम्पन्न झाले.या प्रसंगी ग्रा.प. सदस्य विनोद लंगोटे, चित्रा इंगळे, स्मिता नरोले, अरुणा मानवटकर, सपना बागडे, ज्योती रघटाटे, नंदा गडेकर, करुणा रंगारी, किरण सिंह, वरशा पिल्ले, संकेत सांगोळे, भिवनकर, रोहित कुलमेथे, परागासाहू, सुभद्रा लिल्हारे, ग्रामसेवक योगेंद्र गायकवाड उपस्थित होते.