पालकमंत्र्यांच्याहस्ते दारव्हा तालुक्यातील विविध विकास कामांचे भूमिपूजन, लोकार्पण

– समाजातील सर्वच घटकांना दिलासा देण्याचा प्रयत्न – संजय राठोड

यवतमाळ :- पालकमंत्री संजय राठोड यांच्याहस्ते दारव्हा तालुक्यातील विविध विकास कामे, बांधकामे, भक्त निवास, डिजिटल क्लासरुम, मोकळ्या जागेचे सौदर्यीकरण अशा कामांचे भूमिपूजन, लोकार्पण आज झाले. समाजातील सर्वच घटकांना दिलासा देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात असल्याचे याप्रसंगी पालकमंत्री म्हणाले.

यावेळी पालकमंत्र्यांसह माजी जिप सभापती श्रीधर मोहोड, दारव्हा नपचे मुख्याधिकारी विठ्ठल केदारे उपस्थित होते. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत करण्यात आलेल्या निंभी ते पिंपरी मार्गाचे लोकार्पण पालकमंत्र्यांनी केले. दारव्हा शहरातील नगर परिषद प्राथमिक शाळा दोनच्या पहिल्या मजल्याचे बांधकाम, नगर परिषद मराठी शाळा दोनमध्ये डिजिटल क्लासरूम तसेच इंटेरीयल वर्क, प्रभाग क्रमांक दहा मधील मोकळ्या जागेचे सौदर्यीकरण कामाचे लोकार्पण करण्यात आले. टिळकवाडी ते दिग्रस रोडपर्यंतचे बांधकाम, चावडी हद्दीमध्ये व्यापारी संकूल बांधकामाचे भूमिपूजन पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले.

दारव्हा तालुक्यातीलच प्राथमिक आरोग्य केंद्र, तळेगाव येथील जुनी मुख्य ईमारत निर्लेखन करुन त्याच जागेवर नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र मुख्य ईमारत बांधकाम व अधिकारी, कर्मचारी निवासस्थान बांधकामाचे लोकार्पण, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत प्रमुख जिल्हा मार्ग माहुली ते इरथळ रस्ता भूमिपूजन करण्यात आले.

प्राथमिक आरोग्य केंद्र मांगकिन्ही येथील जुनी मुख्य ईमारत निर्लेखन करुन त्याच जागेवर नवीन इमारत बांधकामाचे भूमिपूजन, जिल्हा परिषद प्राथमिक, उच्च प्राथमिक शाळा बांधकाम भूमिपूजन, मांगकिन्ही, वरझडी सीमा येथील ग्रामीण मार्ग ५८ जोडण्याकरीता लहान पुलाचे बांधकामाचे लोकार्पण, मांगकिन्ही, तेलगव्हाण, करजगाव प्रमुख जिल्हा मार्ग ८३, इतर जिल्हा मार्ग १२ रस्त्याचे सुधारणा कामाचे लोकार्पण पालकमंत्र्यांनी केले.

जगदंबा माता प्रतिष्ठाण डोल्हारी देवी येथे भक्त निवासाचे बांधकाम, संरक्षण भिंतीचे बांधकाम व सौंदर्याकरण, स्वयंपाकगृह व भोजनगृह बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. जवळा, ब्रम्हनाथ, कुऱ्हाड, नांदगव्हाण, राजीवनगर ते राज्य मार्ग २९३ रस्ता, इतर जिल्हा मार्ग १३ या रस्त्याच्या सुधारणा कामाचे भूमिपूजन पालकमंत्री संजय राठोड यांच्याहस्ते आज करण्यात आले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जलसंधारण अधिकारी पदासाठी कागदपत्रांची प्राथमिक पडताळणी,उमेदवारांनी वेळेवर उपस्थित राहण्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन

Tue Oct 15 , 2024
यवतमाळ :- मृद व जलसंधारण विभागातील जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट-ब या अराजपत्रित पदासाठी ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली होती. त्यानुसार उमेदवारांची गुणनिहाय सुधारित मेरीट लिस्ट प्रसिद्ध करण्यात आली आहे. या लिस्टमधील उमेदवारांची प्राथमिक स्तरावर कागदपत्र पडताळणी दि.१६ ते १९ आँक्टोंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथील वाल्मी या संस्थेच्या ठिकाणी होणार आहे. उमेदवारांनी पडताळणीसाठी वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन मृद व जलसंधारण मंत्री संजय […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com