नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या वतीने दक्षिण नागपूर मतदार क्षेत्रामध्ये विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण गुरूवार १४ मार्च रोजी सायंकाळी 6:30 वाजता आयोजित करण्यात आले आहे.
शेषनगर बस स्टॉप, तपस्या शाळा रोड, नागपूर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून भूमिपूजन लोकार्पण केंन्द्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख्याने उपस्थित राहतील. याप्रसंगी आमदार सर्वश्री प्रविण दटके, चंद्रशेखर बावनकुळे, अभिजीत वंजारी, सुधाकर अडबाले, विकास कुंभारे, मोहन मते, कृष्णा खोपडे, डॉ. नितीन राऊत, विकास ठाकरे, मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, मनपा अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, मुख्य अभियंता राजीव गायकवाड यांच्यासह इतर अधिकारी विशेष रुपाने उपस्थित राहतील.
दक्षिण नागपुरातील विविध भागात नागरिकांच्या सुविधेकरिता निर्माण होणा-या स्मार्ट सार्वजनिक शौचालयांच्या कामांचे मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. याशिवाय नालंदा नगर जलकुंभ, आंकोर नगर-१ जलकुंभ, नंदनवन-२ (पवनसूत नगर) जलकुंभ, ताजबाग (ताजबाग मेला मैदान) जलकुंभ, वंजारी नगर-२ (सक्करदरा) जलकुंभ, सक्करदरा-२ (बिडीपेठ) जलकुंभ, बालाजी नगर जलकुंभ या सात जलकुंभांसह सोमवारी क्वॉटर आदिवासी कॉलनी विश्वकर्मा नगर, शिवसुंदर नगर दिघोरी दहनघाट शितला माता मंदिर जवळ आणि ताजबाग दंतेश्वरी नगर दुर्गा मंदिर जवळ येथील तीन आयुष्मान आरोग्य मंदिरांचे तसेच इमामवाडा येथील कुंदनलाल गुप्ता ग्रंथालयाचे लोकार्पण या समारंभात होणार आहे.
शहरातील नागरिकांच्या सुविधेच्या दृष्टीने साकार होत असलेल्या व पूर्णत्वास आलेल्या या प्रकल्पांच्या भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्याला मोठ्या संख्येत नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन अधीक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार यांनी यावेळी केले आहे.