नागपूर :- आदिवासीं हलबा बहुउद्देशीय विकास मंडळ, हुडकेश्वर नागपूरच्या सदस्यांनी हुडकेश्वर रोडवरील जागेवर समाजभवनाचे भूमिपूजन आमदार टेकचंद सावरकर यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी आमदार कृष्णा खोपडे,निवृत्त सहायक महाप्रबंधक धनंजय धापोडकर, निवृत्त अप्पर आयुक्त चंद्रभान पराते,आदिम यूथ फांऊडेशन चे सचिव ओमप्रकाश पाठराबे व नगरसेवक भगवान मेंढे,माजी सरपंच नरेश भोयर अतिथी म्हणून उपस्थित होते.
या समाजभवन बांधकामाचे भूमी पूजन निमित्ताने दिपलक्ष्मी सभागृहात हलबा समाजातील नागरिकांची सभा झाली. या सभेत आमदार टेकचंद सावरकर, निवृत्त बैक अधिकारी धनजंय धापोडकर, निवृत्त अपर जिल्हाधिकारी चंद्रभान पराते व सामाजिक कार्यकर्ते ओमप्रकाश पाठराबे यांनी आदिवासी हलबा बहुउद्देशीय विकास मंडळाच्या या उपक्रमाचे कौतुक करून समाजभवन बांधकामासाठी हलबा समाज बांधवांनी आर्थिक सहकार्य करण्याचे आवाहन केले.
आमदार सावरकर यांनी मंडळाच्या या भूखंडावर संरक्षण भिंत बांधून देण्याचे जाहीर केले तर धनंजय धापोडकर, ओमप्रकाश पाठराबे विनायक वाघ,रवि पराते व भानुसे गुरूजी यांनी या बांधकामास प्रत्येकी रूपये पंचेवीस हजाराची आर्थिक मदत जाहीर केली. हलबा विकास मंडळ, बेसा यांनीही आर्थिक मदत जाहीर केली. समाजभवन बांधकाम कार्यक्रमाचे प्रस्ताविक संस्थेचे सचिव महेश बारापात्रे यांनी,संचालन विनायक वाघ तर आभार संतोष सोनकुसरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आमदार विकास कुंभारे, मंडळाचे अध्यक्ष रमेश धार्मिक, प्रेमनाथ रामटेककर, चंद्रशेखर निलकुटे ,रमेश कोहाड, नारायण पाठराबे,वामन बारापात्रे, गोपाल काटवे,अशोक कुंभारे,गजानन उमरेडकर ,नाना शौरी,अजय वानखेडे, रवि पराते ,भानुसे गुरूजीसह समाज बांधवांनी अथक परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला विविध संघटनेचे पदाधिकारी व सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.