भोंसला बॉक्सर्सनी प्रादेशिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये आपल्या वर्चस्वाची पुनरावृत्ती केली

नागपूर:-भोंसला मिलिटरी स्कूल, नागपूरच्या बॉक्सर्सनी शालेय स्तरावरील स्पर्धांच्या विभागीय बॉक्सिंग आखाड्यात आपली दमदार कामगिरी सुरू ठेवली. जिल्हा चॅम्पियनशिपमध्ये पदक मिळवलेल्या 17 बॉक्सर्सपैकी, 10 सुवर्णपदक विजेते बॉक्सर्स डीएसओ, चंद्रपूर यांनी 26 ते 28 डिसेंबर 22 या कालावधीत आयोजित केलेल्या विभागीय आंतरशालेय बॉक्सिंग स्पर्धेत सहभागी झालेत.

या स्पर्धेत शाळेच्या विद्यार्थ्यानी पाच (05) सुवर्ण पदके, दोन (02) रौप्य पदके आणि एक (01) कांस्य पदक मिळवून एकूण आठ (08) पदक प्राप्त केले. कॅडेट मंथन कोल्हे, कॅडेट रोहित खैरवार, कॅडेट आदर्श केचे, कॅडेट सुमित भिसे आणि कॅडेट तेजस पेंदाम अशी सुवर्णपदक विजेत्याची नावे आहेत; रौप्यपदक विजेते कॅडेट हर्षित भोयर आणि कॅडेट नोव्हिल भांडारकर आहेत तर कांस्यपदक विजेता कॅडेट लिकेश यादव आहे.

शालेय व्यवस्थापनाने बॉक्सर आणि त्यांचे प्रशिक्षक सुभेदार जगदीश दिघे आणि अनिल साळवी यांचे या कामगिरीबद्दल कौतुक केले आणि सुवर्णपदक विजेत्यांना त्यांच्या जानेवारी 2023 मध्ये होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

९ महिने पुर्ण झालेल्या बालकांना इंजेक्शनद्वारे पोलिओचा तिसरा डोस    

Tue Jan 3 , 2023
१ जानेवारी पासुन झाला प्रारंभ   चंद्रपूर :- पोलिओ नियमित लसीकरण अंतर्गत बालकास जन्मानंतर ६ आठवडे पूर्ण झाल्यावर पहिला डोस तसेच १४ आठवडे पूर्ण झाल्यावर दुसरा डोस असे एकूण २ डोस देण्यात येतात तसेच ५ वर्षाच्या आतील मुलांनाही वर्षातून दोन वेळेस पोलिओचा ओरल डोस दिला जातो. तथापि शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार दिनांक १ जानेवारी २०२३ पासून f-IPV लसीचा तिसरा डोस बालकास नऊ […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com