नागपूर :- भोई विद्यार्थी संघटना, नागपूर पुरस्कृत भोई-ढिवर समाज कल्याणकारी बहुउद्देशिय संस्था, व भोई ढिवर समाजमित्र बचत गट व भोई समाज महिला बहुउद्देशिय संस्था तसेच भोई महिला समाज बचतगट यांच्या संयुक्त विद्यमाने श्री गुरुदेव सेवाश्रम, आग्याराम देवी चौक येथे नुकत्याच झालेल्या १३ नोव्हेंबर रोजी भोई ढिवर समाज वधु-वर परिचय मेळावा संपन्न झाला. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी भारतीय भोई विकास मंडळचे अध्यक्ष अँड. दादासाहेब वलथरे होते. मेळाव्याच्या प्रारंभी भोई मच्छीमार समाजाचे दिवंगत नेते माजी खासदार जतीराम बर्वे तसेच सरस्वती देवी आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यामेळाव्याप्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यामध्ये 10 चे उत्तीर्ण 10 विद्यार्थी, 12 चे उत्तीर्ण 11 विद्यार्थी, विविध विद्याशाखेतील पदवीधर 15 विद्यार्थी आणि उत्कृष्ट 2 खेळाडू असे एकुण 38 विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. याच कार्यक्रमात सेवानिवृत्त 14 भोई ढिवर समाज कर्मचा-यांचा सत्कार करण्यात आला आणि समाज सेवा करणारे इतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. याच कार्यक्रमात ढिवर समाजातील पंचायत समीती सदस्य म्हणून निवडून आलेल्या, ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आलेल्या दोन कार्यकत्यांचा सत्कार करण्यात आला. आंतराष्ट्रीय पातळीवर ज्यांचे नाव लिमका बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये पाण्यातील विविध प्रकारचे योगा करून दाखवणारे 85 वर्षीय कृष्णाजी नागपुरे, चंद्रपूर यांचा देखील शाल श्रीफल देउन सत्कार करण्यात आला.
यावेळी एकुण 110 उपवर वधु यांनी आपला व्यक्तिगत परीचय दिला ज्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील युवक युवतीचा समावेश होता. विशेष म्हणजे या मेळाव्यात महाराष्ट्र राज्या व्यतीरीक्त हैद्राबाद, चंद्रपूर, पुणे, भंडारा, गोंदिया, सोलापुर, सांगली, वर्धा, यवतमाळ, कोल्हापुर जिल्हयातील व विशेषतः संपुर्ण विधर्भातील सुमारे 1500 समाज बंधु भगीनींनी यात भाग घेतला होता. मंचावर सेवानिवृत्त न्यायाधिश व सदस्य राज्य मागासवर्ग आयुक्त पुणेचे चंद्रलाल मेश्राम, अँड. दादासाहेब वलथरे, प्रकाश पचारे, अँड.ए.एन. दिपोरे, मीनाक्षी गेडाम, संजय नान्हे, मारोतराव पडाळ, प्रा.राहुल गौर, अँड. सुजाता वाल्देकर, अँड. प्रांजली हुकरे, डॉ. हिरालाल मेश्राम, सुकेश मारबते, भाग्यश्री बावनकुळे, सुलोचना नाव्हे, मेब्रे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन भोई विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष महेंद्र पारसे आणि भोई समाज महिला बहुउद्देशिय संस्थेच्या पदाधिकारी कल्पना चाचेरकर यांनी केले. याप्रसंगी मेळाव्याचे प्रास्ताविक भोई विद्यार्थी संघटनेचे सचिव दिलीप पारसी यांनी केले तर आभार दिलीप कैलुके यांनी मानले.