नागपूर :- भारत विकास परिषदेच्या दक्षिण-पश्चिम शाखेच्यावतीने आयोजित भारत को जानो स्पर्धेत सिनिअर गटातून न्यु अपोस्तोलिक आणि ज्युनिअर गटातून भिडे हायस्कुलने विजेतेपद पटकावले. ज्युनियर गटातून न्यु अपोस्तोलिक आणि सिनिअर गटातून दीनानाथ हायस्कुलनें उपविजेते पद पटकावले.भाविपच्या दक्षिण – पश्चिम शाखेच्यावतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. निरंजन देशकर आणि आशिष महाजन यांनी भारत माता पूजन करून स्पर्धा सत्राचे उद्घाटन केले. प्राचार्या अर्चना गढीकर, निलिमा बावणे, संजय गुऴकरी, पद्माकर धानोरकर आणि सचिन धन्नावत मान्यवरांच्या हस्ते विजेता-उपविजेता चमूला सन्मानित करण्यात आले. सीमा मुनशी आणि रवी संगवईयांनी स्पर्धा संचालक म्हणून काम पाहिले. स्पर्धेतील विजेता चमूला आता प्रांत स्तरावरील स्पर्धेकरिता पुरस्कृत केले जाईल. भाविपची ही स्पर्धा राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेची स्पर्धा मानली जाते. देशाचा इतिहास, भूगोल, संस्कृती, भाषा इ. विषयांवर आधारित या स्पर्धेतून देशाची प्रत्यक्ष ओळख विद्यार्थ्यांना करुन देत, त्यांना शिक्षित करण्याचा परिषदेचा हा राष्ट्रीय कार्यक्रम आहे.