व्हीआयडीसीच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी पदी भारती झाडे

नागपूर :- महाराष्ट्र राज्य लेखा व वित्त सेवेतील संचालक संवर्गातील अधिकारी भारती विकास झाडे यांनी विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर च्या (व्हीआयडीसी) मुख्य लेखा व वित्त अधिकारी पदाचा पदभार स्वीकारला आहे.

दिल्ली स्थित केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) अंतर्गत लेखा परीक्षक आणि वित्तीय सल्लागार म्हणून श्रीमती झाडे यांनी यशस्वी कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर त्यांची नियुक्ती व्हीआयडीसीच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी पदावर करण्यात आली आहे. श्रीमती झाडे या महाराष्ट्र राज्य लेखा व वित्त सेवेच्या १९९४ तुकडीच्या अधिकारी आहेत. मुंबई येथे अन्न व नागरी पुरवठा विभागात सहाय्यक संचालक म्हणून त्यांच्या शासकीय सेवेस सुरुवात झाली. त्यांनी वरिष्ठ कोषागार अधिकारी नागपूर, यशदा पुणे, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, सहसंचालक, लेखा व कोषागारे, नागपूर म्हणून तसेच श्रीमती नाथीबाई दामोदार ठाकरसी महिला विद्यापीठ मुंबई येथेही त्यांनी वित्त विभागाच्या प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.

झाडे यांनी दिल्लीस्थित भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या वित्त विभागाच्या सहसंचालक पदी परसेवेत रुजू झाल्या. त्यानंतर दिल्ली येथे महाराष्ट्र सदनाच्या सहायक निवासी आयुक्त पदाची जबाबदारी त्यांनी पार पाडली. २०१७ पासून त्या सीबीएसईच्या वित्त सल्लागार म्हणून कार्यरत होत्या.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Athletics - Komal Jagdale wins silver in steeplechase, bronze in mixed relay

Sat Nov 4 , 2023
Panaji :- Maharashtra’s Komal Jagdale won a silver medal in the 3000 meters steeplechase race on the final day of the athletics event at the National Games on Friday. Similarly, Maharashtra got a bronze medal in the 4 by 400 meters mixed relay event. Komal covered the distance in 10 minutes 21.66 seconds at the GMC Athletics Stadium in Bambolim. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com