गणेश मूर्तींची उंची संदर्भात भारतीय जनता युवा मोर्चाने दिले मनपाला निवेदन!

नागपूर –  गणपती हे महाराष्ट्राचे नव्हे तर संपुर्ण देशाचे आराध्य दैवत आहे. यंदा २०२२ चा गणेश उत्सव हा ३१/०८/२०२२ ते ०९/०९/२०२२ दरम्यान रहाणार आहे. अश्या वेळी मागील दोन वर्षांपासुन कोविडमुळे आपण साजरा करू शकलो नसल्यामुळे सर्वांच्या मनात उत्साह आणि आनंद असतांना प्रशासनाने गणपतीची मुर्ती ही केवळ ४ फुटाची असावी असा नुकताच आदेश काढला आहे. यामुळे दोन समुहांमध्ये परिणाम पडला आहे. एक म्हणजे मुर्तीकार ज्यांनी तीन ते सहा महिन्यांपुर्वीच आपल्या कामाची सुरूवात केली होती. ज्यांच्यासाठी हा निर्णय हा आर्थिक प्रमाणावर नुकसान करणारा आहे आणि दुसरा परिणाम हा सामान्य माणसाच्या उत्साहावर होईल.

 

गणपती उत्सवाच्या निमित्याने लोक मोठ्या प्रमाणावर एकत्रित होतात व हा उत्सव साजरा करतात. या निर्णयामुळे त्यांच्या देखील उत्सहावर आघात पडणार आहे. त्यामुळे आपण सामान्य जनतेची भावना व मुर्तीकारांचे आर्थिक नुकसान होणार नाही याची प्रमुख खबरदारी घेण्याकरीता भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातुन मनपा अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांना निवेदन देण्यात आले.

चार फूटापेक्षा अधिक उंच गणेश मूर्तीवर लादलेले निर्बंध तत्काळ मागे घेण्याबाबत महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांच्यासोबत यावेळी चर्चा झाली. उद्या सायंकाळपर्यंत निर्णय मागे न घेतल्यास भाजप वेगळी भूमिका घेईल, असेही यावेळी अतिरिक्त आयुक्तांना सांगण्यात आले. यावेळी प्रमुख्याने भाजपा प्रदेश महामंत्री व माजी पालकमंत्री आ. चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा शहराध्यक्ष आ. प्रवीण दटके, माजी महापौर संदीप जोशी, शिवानी दाणी वखरे, प्रदेश महामंत्री, भाजयुमो महाराष्ट्र, पारेंद्र पटले, शहर अध्यक्ष, भाजयुमो नागपुर महानगर, महामंत्री सचिन करारे, दिपांशु लिंगायत, अमोल तिडके, निलेश राऊत, शौनक जहांगीरदार, प्रसाद मुजुमदार, मनमित पिल्लारे, चेतन धार्मिक, समीर मंडले, अथर्व त्रिवेदी, शुभम वेलंकीवार, एजाज शेख, वरूण गजभिये , आशुतोष भगत, शिव कटरे, अंकित वानखेडे, आशिष तुरकर यांच्या समवेत मुर्तीकार राकेश पाठराबे, रघु मैसाने, सचिन दुरुगकर, सचिन चव्हाण, निलेश इंगळे, सूर्या डोमडे व गणेश उत्सव मंडळांचे पदाधिकारी देखील उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

डॉ. नितीन राऊत यांचा पुन्हा उत्तर नागपूर दौऱ्याचा झंझावात

Tue Jul 12 , 2022
विविध विकास कामांची केली पाहणी नागपूर – माजी ऊर्जामंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सोमवारी पुन्हा एकदा आपल्या उत्तर नागपूर मतदारसंघाचा झंझावाती दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी गेल्या अडीच वर्षांच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात सुरू केलेल्या विकासकामांचा आढावा घेऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. डॉ. नितीन राऊत यांनी नवा नकाशा, समतानगर, लष्करीबाग, कमाल चौक, टेका नाका, वैशालीनगर, मिलिंदनगर, बुद्धनगर, यादवनगर, हाऊसिंग […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com