नागपूर :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दि. १४ एप्रिल रोजी सकाळी मनपा मुख्यालयातील इमारतीच्या दालनात भारतीय संविधानाचे निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राला माल्यार्पण करून मनपाचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी अभिवादन केले.
याप्रसंगी मनपाचे मुख्य अभियंता राजीव गायकवाड, उपायुक्त प्रकाश वराडे, माहिती तंत्रज्ञान विभागाचे संचालक महेश धामेचा, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, मुख्य अग्निशमन अधिकारी बी.पी. चंदनखेडे, सहायक आयुक्त नरेंद्र बावनकर, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी उपस्थित होते.
यानंतर आयुक्तांनी नागपुरातील संविधान चौकामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले. यावेळी मुख्य अभियंता राजीव गायकवाड, समाज कल्याण विभागाचे उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड, सहायक आयुक्त सुकेशनी तेलगोटे, उपायुक्त श्री. प्रकाश वराडे, माहिती तंत्रज्ञान विभागाचे संचालक महेश धामेचा, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी उपस्थित होते.
मनपा आयुक्तांनी नागपूरकरांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, बाबासाहेबांनी आपल्यासाठी तयार केलेले संविधान सर्वोत्तम असून आपण सगळ्यांना त्याचा लाभ मिळत आहे. समाजाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी आणि सर्वजण समानतेने कसे राहू शकतील यासाठी बाबासाहेबांनी कार्य केले आहे.