– अनुसुचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ घेणेसाठी अर्ज करण्याचे आवाहन
गडचिरोली :- अनुसुचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतीगृहात अर्ज करुन देखील शासकीय वसतीगृहात प्रवेश मिळालेला नाही अशा विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षण घेता यावे अशा विद्यार्थ्यांना भोजन, निवास, निर्वाह भत्ता, व इतर शैक्षणिक सुविधा स्वत: उपलब्ध करून घेणेसाठी आवश्यक ती रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये थेट जमा करणे करिता शासनाने दि. 26 डिसेंबर 2024 च्या सुधारित शासन निर्णयान्वये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरु करण्यात आलेली आहे.
सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी सन 2024-25 या शैक्षणिक सत्राकरिता विद्यार्थ्यांकडुन ऑनलाईन अर्ज मागविण्यात आलेले होते. त्या अनुषंगाने ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करतेवेळी स्वत:चे अधार लिंक खाते क्रं. सादर केलेले नाही त्या विद्यार्थ्यानी आपले खाते ऑनलाइन अर्ज ज्या लॉग ईन आय डी वरुन सादर केले आहे त्या वरुन आपले खाते क्र. 28 मार्च 2025 पर्यंत सादर करावे. असे सहाय्य्क आयुक्त, समाज कल्याण, गडचिरोली यांनी कळविले आहे.