भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सन 2024-25

– अनुसुचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ घेणेसाठी ऑनलाईन अर्ज करणेबाबत.

गडचिरोली :- अनुसुचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांना शासकिय वसतीगृहात अर्ज करुनदेखील शासकिय वसतीगृहात प्रवेश मिळालेला नाही अशा विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षण घेता यावे आणि विद्यार्थ्यांना भोजन,निवास,निर्वाह भत्ता,व इतर शैक्षणिक सुविधा स्वत: उपलब्ध करून घेणेसाठी आवश्यक ती रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये थेट जमा करणेकरिता शासनाने दि.13 जुन 2018 च्या सुधारित शासन निर्णयान्वये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरु करण्यात आलेली आहे.सन 2024-25 या आर्थिक वर्षात योजनेचा लाभ घेणेकरिता विद्यार्थ्यांना वसतीगृह व स्वाधार योजनेचे अर्ज करणेकरिता एकच ऑनलाईन पोर्टल सुरु करण्यात आले आहे.

अनुसुचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांना शासकिय वसतीगृहात अर्ज करुनदेखील शासकिय वसतीगृहात प्रवेश मिळालेला नाही अशा विद्यार्थ्यांचे अर्ज प्रणालीद्वारे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेकरिता ग्राह्य धरले जाऊन नियमानुसार पुढील पडताळणीसाठी संबंधित सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाच्या लॉगईन वर अग्रेषित केले जातील. सदर माहिती पोर्टलवरील लॉगीनमध्ये विद्यार्थ्यांनी परिपुर्ण भरणे आवश्यक आहे.विद्यार्थ्यांनी सदर माहिती अपुर्ण भरल्यास सदर अर्ज अपात्र करण्यात येईल व त्यासाठी सर्वस्वी विद्यार्थी जबाबदार राहील याबाबत नोंद घेण्यात यावी.सदर योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम दि. 16.12.2024 असा आहे. तसेच अर्ज करण्याकरिता https://hmas.mahait.org या ऑनलाईन पोर्टलवर करावे.

टीप-सदर योजनेच्या ठळक निकषामध्ये विद्यार्थी पात्र ठरत नसल्यास अश्या विद्यार्थ्यांचे अर्ज थेट अपात्र ठरविण्यात येईल. असे सहाय्यकआयुक्त, समाज कल्याण गडचिरोली यांनी कळविले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलावंत यांना मानधन सन्मान योजनेअंतर्गत जेष्ठ कलावंतांचे आधार पडताळणी करण्याचे आवाहन

Sat Nov 30 , 2024
गडचिरोली :- राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यक व कलावंत सन्मान योजनेअंतर्गत गडचिरोली जिह्यातील 540 लाभार्थीपैकी दिनांक 27.11.2024 पर्यंत 427 लाभार्थींचे ऑनलाइन आधार व्हेरिफिकेशन झालेले असून 113 लाभार्थींचे आधार व्हेरिफिकेशन प्रलंबित आहे. तेव्हा प्रलंबित लाभार्थीचे आधार व्हेरिफिकेशन करण्यासाठी शासनाने 10 डिसेंबर 2024 ही अंतिम मुदत दिलेली असुन सदर लाभार्थीनी आधार व्हेरिफिकेशन विहीत मुदतीत करण्याची कार्यवाही आपल्या तालुक्यातील गट विकास अधिकारी, पंचायत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com