संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- आज संपूर्ण देशात सुरू असलेल्या असहिष्णुतेच्या व अराजकतेच्या विरोधात नागरिकांची मानसिकता बदलवने या मुख्य उद्देशाने संविधान बचाओ,ओबीसीला 52 टक्के आरक्षण लागू करणे, केंद्र सरकार द्वारा ओबीसीची जाती आधारित जनगणना न करणे चा विरोध, खाजगी क्षेत्रात आरक्षण करणे, एमएसपी गॅरंटी कायदा लागू करणे, कामगारांच्या विरोधात लागू करण्यात आलेला कायदा मागे घेणे, ईव्हीएम चा विरोध ,एन आर सी ,सीएए व एनपीआर चा विरोध, एस सी एस टी ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणे तसेच लोकतंत्र बचाओ अभियान अंतर्गत राष्ट्रीय संयोजक वामन मेश्राम यांच्या नेतृत्वात आज 29 नोव्हेंबर ला जयस्तंभ चौकात विरोध प्रदर्शन करीत भारत बंद आंदोलन करण्यात आले.
या भारत बंद आंदोलनात बहुजन क्रांती मोर्चा चे नागपूर जिल्हा उपाध्यक्ष हेमलता पाटील, निलेश मेश्राम, हर्शवर्धन मेश्राम, रमा उके, छाया गाडगे, शकुंतला ठवरे,नंदा डोंगरे, सत्यभामा वाघमारे, रंजना चहांदे, शोभा मेश्राम, नंदा गजभिये, अनिता फुलझेले,अश्वगंधा पाटील आदींचा समावेश होता.