– राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे माजी खासदार मधुकर कुकडे यांची घोषणा
भंडारा :- राज्याच्या निवडणूकीची घोषणा ही कोणत्याही क्षणी होणार असून महाविकास आघाडीच्या वतीने तिकीटचे वाटप करण्यासाठी काल दिनांक २० सप्टेंबरला मुंबईत चर्चा घेण्यात आली. यात भंडारा जिल्ह्याचे विषय पुढे आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांचा पक्ष हा तुमसर तर लढणार आहेच सोबत भंडारा-पवनी विधानसभा देखील लढण्याची तयारी शरद पवार यांनी चर्चेत बोलून दाखवली. त्यामुळे आता भंडारा-पवनी विधानसभा ताकदीने लढण्यासाठी सज्ज झाले असल्याची माहिती यावेळी मिळाली.
मुंबई येथे पार पडलेल्या चर्चेत भंडारा-पवनी विधानसभा क्षेत्राची मागणी केली असून जनतेपर्यत शरद पवार यांची सूचना पोहचविण्यासाठी दिनांक २१ सप्टेंबरला भंडारा येथील विश्रामगृहात पत्रकार परिषदेमध्ये माहिती देण्यात आली आहे. आगामी दिवसात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांचे आमदार होणार.. कार्यकर्त्यांनी कामाला लागा.. तयारीला सुरुवात झाली आहे.. आता आमचे ठरले.. अशी घोष वाक्य म्हणत माजी खासदार मधुकर कुकडे यांनी पत्रकार परिषदेत गर्जना केली.
याप्रसंगी भंडारा-पवनी विधानसभा अध्यक्ष अजय मेश्राम, पवनी तालुकाध्यक्ष कुणाल पवार, भंडारा तालुकाध्यक्ष ईश्वर कडंबे, शहरध्यक्ष मधुकर चौधरी, सुकराम अतकरी, राकेश शामकूवर, मधुकर भोपे, अथर्व गोंडाने, नीलिमा रामटेके, योगिता सूर्यवंशी, लता बावनकुळे, शरीफ खान, राजा खान व इतर पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.