मुंबई : भंडारा जिल्ह्यातील बेला येथील महर्षी विद्या मंदिर शाळेबाबत प्राप्त तक्रारीसंदर्भात कार्यवाही सुरू आहे, याबाबत शाळेच्या विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेण्यात येईल अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी विधानसभेत दिली.
भंडारा जिल्ह्यातील बेला येथील महर्षी विद्या मंदिर शाळेच्या गैरव्यवस्थापनाविरूद्ध शासनस्तरावरून कोणती कार्यवाही केली जात आहे, लोकप्रतिनिधीव्दारे शाळेची मान्यता रद्द करावी अशी मागणी असणारी लक्षवेधी विधानसभा सदस्य नरेंद्र भोंडेकर यांनी मांडली होती.
शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड म्हणाल्या, भंडारा जिल्ह्यातील बेला येथील महर्षी विद्या मंदिर शाळेबाबत प्राप्त झालेल्या तक्रारींची तपासणी करू.मात्र शालेय शिक्षण विभाग विद्यार्थ्यांचे नुकसान होवू नये हे देखील पाहणार आहे.या शाळेबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींकडून प्राप्त झालेल्या तक्रारींच्या अनुषंगाने चौकशी सुरू आहे अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी विधानसभेत सादर केली.