भंडारा गोंदीया जिल्ह्यातील गोसीखुर्द प्रकल्पाचा पर्यटन विकास झाल्यास तरुण मुलांना रोजगार मिळेल – मंत्री नितीन गडकरी

– राष्ट्रीय महामार्ग 53  वरील     सहापदरी बायपासच्या   कामाचे भूमीपूजन  गडकरींच्या हस्ते संपन्न 

नागपूर – ताडोबा ,पेंच, नागझिरा या ठिकाणी पर्यटक येतात यासोबतच भंडारा गोंदीया जिल्ह्यातील  गोसीखुर्द प्रकल्पाचा पर्यटन विकास झाला आणि गोसेखुर्द या  जागतिक दर्जाच्या धरणातील वॉटर स्पोर्ट्स आणि बोटिंग सर्विस चालू झाल्या तर  भंडाऱ्यातील पर्यटनाला चालना मिळेल व  पर्यटनातून तरुण मुलांना रोजगार मिळेल  ,  असे  प्रतिपपादन  केंद्रीय रस्ते वाहतूक ,  महामार्ग मंत्री  नितीन गडकरी  यांनी आज केले. भंडारा जिल्ह्यात   राष्ट्रीय महामार्ग 53  वरील  14 पूर्णांक 80 किलोमीटर लांबीचा सहापदरी बायपासच्या  421 पूर्णांक 40 कोटी रुपयांचा तरतुदीने बांधला जाणा-या कामाचे भूमीपूजन आज त्यांच्या ह्स्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. 

 या   रस्त्यामुळे वैनगंगा नदी वरच्या पुलावरील वाहतुकीचा भार हा कमी होणार आहे . भंडारा जिल्ह्यातील  वाहतुक कोंडी  थांबणार असून वेळ आणि इंधनाची बचत होणार असल्याचे नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितले . नागपूर भंडाराच्या सीमेवर असणाऱ्याअंभोरा येथील केबल स्टेड पूलाचे निरीक्षण त्यांनी केले . या पुलावर व्हुअर गॅलरी,  कॅप्सूल लिफ्ट अशा प्रकारच्या सुविधा असतील त्यामुळे गोसेखुर्द धरणातील बॅकवॉटरच्या पर्यटनाला मिळणार आहे.  या पुलामुळे नागपूर ते भंडारा -गोंदिया ही वाहतूक सुरळीत होणार असून अंभोरा ते भंडारा हे अंतर पार करण्यासाठी लागणारा दीड तासाचा वेळ कमी होऊन आठ ते दहा मिनिटात पोहोचणे शक्य होणार आहे . भंडारा जिल्हा प्रशासनाने जर  दोन टेकड्यांना जोडण्याची परवानगी दिली तर भंडारा नागपूर या जिल्ह्यांना हवेत जोडणारा रोपवे आपण निर्माण करू असेही गडकरी यांनी सांगितले.  

ब्रॉड गेज  रेल्वे प्रकल्पाच्या माध्यमातून नागपूर ते गोंदिया चंद्रपूर भंडारा अशा शहरांना ब्रॉडगेज मेट्रोने जोडण्यात असल्याने 140 कोटी किलोमीटर प्रतितास वेग असणाऱ्या रेल्वे गाड्या मुळे भंडाऱ्याला  नागपूरवरून अर्ध्या तासात पोचता येईल असे गडकरी यांनी सांगितलं. यासोबतच भंडारा रेल्वे स्टेशनच्या बाजूला जर ‘ड्राय पोर्ट’  साठी जागा करून द्यायला जिल्हा प्रशासन तयार असेल तर भंडार्‍यातून निर्यात होणाऱ्या  बॉईल्ड  तांदळाचे  आयात निर्यात केंद्र सुद्धा विकास करण्यासाठी मदत होईल असेही त्यांनी नमूद केलं.

  भंडारा ते पवनी  रस्त्याच्या बांधकामात   वन विभागाचा अडसर येत असू न  ज्या जमिनीवर वन विभागाद्वारे डिनोटिफाईट म्हणून नोंदणी आहे   तेथे वन विभागाने अडचण आणली आहे, असे त्यांनी सांगितल.   भंडारा तुमसर राष्ट्रीय महामार्ग  म्हणून घोषित केले   असून हा मार्ग  बालाघाट पर्यंत  जाईल अशी   माहितीही  त्यांनी दिली . 

याप्र्संगी भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार सुनील मेंढे, स्थानिक लोकप्रतिनिधी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी  तसेच भंडारा  जिल्ह्यातील नागरिक मोठ्या  मोठ्या संख्येने उपस्थित  होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

कचरा पेटवल्याने डाकघराला लागली आग

Fri Mar 4 , 2022
– तक्रारीवरून गुन्हा दाखल  बेला : बाहेरून डाकघराच्या भिंतीशी कचरा पेटवण्यात आल्यामुळे आत मध्ये ठिणगी जाऊन बेला येथील शाखा डाक कार्यालयाला आग लागली. सकाळची वेळ असल्याने दिसताक्षणी आसपासचे नागरिक धावल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. मात्र या आगीत डाक घराचा दस्तऐवज व दोन संगणकीय मशीन असा एकूण 65 हजार रुपये किमती च्या मालमत्तेचे नुकसान झाले. डाक लेखापाल देवराव नरड यांनी बेला […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com