संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– शेकडो च्या वर रक्तदात्यांनी केले स्वेच्छेने रक्तदान
कामठी :- दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा यादव नगर येथे भगवान श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला असून यादव युवा चेतना कामठी द्वारा आयोजित श्री कृष्ण जन्मोत्सवाची धूम दिसून येत आहे. श्रीकृष्ण जन्मोत्सव निमित्त 7 सप्टेंबर ला माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या शुभ हस्ते सायंकाळी साडे सात वाजता मूर्ती स्थापना करण्यात आली त्यानंतर रात्री 12 वाजेपासून श्री कृष्ण मानस मंडल द्वारा अखंड रामायण पाठ करण्यात आले तर आज 8 सप्टेंबरला श्रीकृष्ण मंदिर परिसरात आयोजित रक्तदान शिबिरात शेकडोच्या वर रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले.या रक्तदान शिबिराला नागपूर चे श्री साईनाथ ब्लड बँक च्या चमूने विशेष आरोग्य सेवा पुरविली. रात्री 8 वाजता जयस्तंभ चौकात दही हंडी कार्यक्रम होणार असून उद्या 9 सप्टेंबर ला दुपारी 3 वाजता यादव नगर येथून भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. तसेच 11 सप्टेंबर ला दुपारी 3 वाजता श्री कृष्ण मंदिर परिसरात खासदार कृपाल तुमाणे व आमदार टेकचंद सावरकर यांच्या विशेष उपस्थितीत महाप्रसाद वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तेव्हा या श्रीकृष्ण जन्मोत्सव कार्यक्रमात सर्वांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन यादव युवा चेतना यादव नगर कामठी च्या वतिने करण्यात आले आहे.
भारतीय परंपरेनुसार श्रावण मासात येणारा श्रीकृष्ण जन्माष्टमी पर्व असून याच दिवशी भंगवान श्रीकृष्णाने दृष्ट राक्षसांचा नाश करण्यासाठी व सज्जनांचे संरक्षण करण्यासाठी जन्म घेतला.हा पर्व यादव नगर येथे मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येत असून यादव युवा चेतना यादव नगर कामठी च्या वतीने 7 ते 11 सप्टेंबर पर्यंत आयोजित श्रीकृष्ण जन्मोत्सवची धूम कायम आहे. या श्रीकृष्ण जन्मोत्सव कार्यक्रमातुन या भक्तिमधून भगवान श्रीकृष्णाला ‘सगळ्यांना गुण्यागोविंदाने नांदू दे च्या मागणीची साकडे घातले .या श्रीकृष्ण जन्मोत्सव कार्यक्रमानिमित्त यादव नगर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी यादव युवा चेतना यादव नगर कामठी चे समस्त भाविकगण मोलाची भक्तिमय भूमिका साकारत आहेत.