संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- येत्या काही दिवसानंतर कामठी नगर परिषद निवडणुकीचा बिगुल वाजणार असून नववर्षाची सुरुवात सुद्धा होणार आहे तेव्हा पोस्टरवार शुभेच्छुकांचा जणू काही वर्षाव होणार असल्याने वाटेल त्या ठिकाणी नगर पोस्टर, बॅनर, होर्डिंग ची उभारणी करून देखावा करीत स्वतःची प्रसिद्धीचे चित्र निर्माण होणार असल्याचे दृष्टिक्षेपास येते मात्र हे सर्व प्रसिद्धीच्या झोकात जाहिरात होर्डिंग लावताना कामठी नगर परिषदची परवानगी घेणे बंधनकारक आहे तसेच उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये शहरात जाहिरात होर्डिंग लावण्यात येत असलेल्या जाहिरातीवर नगर परिषदद्वारे परवानगी देण्यात आलेले क्यू आर कोड लावणे बंधनकारक असल्याचे निर्देशित केले आहे तेव्हा खबरदार…विना परवानगी जाहिरात होर्डिंग लावाल तर…विना परवानगी होर्डिंग लावणाऱ्या विरुद्ध कायदेशीर कारवाही करण्यात येणार असल्याचा ईशारा मुख्याधिकारी संदीप बोरकर यांनी दिला आहे.
निवडणुकीची चाहूल लागण्याच्या मार्गावर असून राजकीय मंडळी ‘नाव मोठं’ या सदराखाली चौका चौकात होर्डिंग लावताना दिसणार आहेत तसेच नेत्यांचे वाढदिवस ,सणोत्सव काळात काही हौशी मंडळी मुख्य चौकामध्ये होर्डिंग लावण्यात स्थानिक कार्यकर्ते रंगून गेली असतात.कामठी नगर परिषदची अधिकृत परवानगी न घेता विना परवानगी अनधिकृत होर्डिंग लावण्याचे प्रमाण वाढले असल्याने एकीकडे शासनाचा महसूल बुडत असल्याचे निदर्शनास येत असून या नियमबाह्य होर्डिंगस मुळे कामठी शहराचे ‘स्वच्छ व सुंदर शहर’ही संकल्पनाच धुळीस मिळाल्याचे चित्र निर्माण होत असल्याने याकडे गांभीर्याने लक्ष पुरवून नुकतेच मुख्याधिकारी संदीप बोरकर यांनी कामठी नगर परिषद द्वारे सर्व पक्षीय राजकीय नेत्यांना बोलावून विना परवानगी होर्डिंग न लावता कामठी नगर परिषदची रीतसर परवानगी घेऊन क्यू आर कोडंसह जाहिरात होर्डींग लावावे अन्यथा कायदेशीर कारवाही होणार असे निर्देशित सुद्धा करण्यात आलेले आहे.
बॉक्स-होर्डिंग बॅनर वर क्यूआर कोड घेणे आवश्यक-कामठी नगर परिषद ची परवानगी घेऊन लावण्यात येणाऱ्या जाहिरात होर्डिंग ,बॅनर वर क्यू आर कोड लावणे बंधनकारक आहे.या क्यू आर कोड मध्ये जाहिरातदाराची माहिती राहणार असून परवानगी घेण्यात आलेली तारीख, कालावधी नमूद होणार आहे.