– जल्लोषात निघाली विजयी रॅली
बेला :- बेला येथील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये जि. प.सदस्य वंदना बालपांडे यांचे यजमान अरुण देवराव बालपांडे यांचा सरपंचपदाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार असतानाही दणदणीत विजय झाला. त्यांच्या गटाचे 17 पैकी 12 सदस्य सुद्धा निवडून आले. एकतर्फी व घवघवीत यशामुळे बालपांडे यांचे समर्थकांनी गावात जल्लोषात रॅली काढून उत्साहात भव्य स्वागत केले.
बेला येथे सरपंचपदासाठी 10 उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी अरुण बालपांडे यांनी 1810 मते घेऊन त्यांनी भाजपचे प्रशांत नागोसे यांचा 791 मतांनी दारून पराभव केला. काँग्रेसचे यशवंत डेकाटे तिसऱ्या स्थानावर राहिले. बालपांडे यांच्या 12 विजयी सदस्यांमध्ये योगेश गाते, नितु आत्राम,शालू लांडे,प्रशांत लांबट,कल्पना पादाडे,हेमलता झगडे, राजु रोडे,नाजुका धनकासार,नितीन बालपांडे, संजय पुरके, सुनीता कावळे व मिलिंद सातकर यांचा समावेश आहे. भाजपाचे अभिनव गोळघाटे, माया आंबटकर व रेखा उरकुडे ,काँग्रेस गटाचे सुरज कांबळे व सेना राष्ट्रवादीच्या बेला महाविकास आघाडीच्या शिला गंधारे विजयी झाल्या. बालपांडे यांनी 2020 च्या जि. प.निवडणुकीप्रमाणे कोणत्याही पक्षात न जाता अपक्ष म्हणूनच गट उभा करून दणदणीत विजय मिळवला. त्यामुळे गावात त्यांची सर्वत्र स्तुती होत आहे. ते माजी मंत्री सुनील केदार व राजेंद्र मुळक यांचे समर्थक आहे.