संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 6 :- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने माधवबाग व दैनिक देशोन्नती च्या संयुक्त विद्यमाने सोमवार 8 ऑगस्ट ला सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत कामठी येथील पोरवाल पार्क स्थित राजीव गांधी सभागृहात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.या शिबिराचे उदघाटन देशोन्नती नागपूर चे शाखा व्यवस्थापक लक्ष्मीकांत संगवई ,माधवबाग चे वरिष्ट अधिकारी प्रशांत ठाकरे, माधवबाग चे वरिष्ठ अधिकारी प्रसिद्ध आरोग्यतज्ञ डॉ गौरव शेळके,माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर, प्रजापिता ब्रह्मकुमारी प्रेमलता दीदी,कामठी नगर परिषद चे माजी उपाध्यक्ष अजय कदम, माजी उपाध्यक्ष काशीनाथ प्रधान, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल शिरे,वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष वैरागडे यांच्या हस्ते होणार आहे.तर या मोफत आरोग्य शिबिरासाठी कामठी नगर परिषद च्या वतीने राजीव गांधी सभागृहाची व्यवस्था करून देण्यात आलेली आहे .
आजच्या स्पर्धात्मक युगातील धावपळीच्या जीवनात बदलती जीवनशैली , खाण्यापिण्याची बदललेली पद्धत व अनियमित आहारामुळे मानवी जीवनात विविध रोगांनी घर करून बसले असून अकाली मृत्यूचे प्रमाण वाढीवर आहेत.तेव्हा शरिराची काळजी घेणे हे सर्वांचे मानवी कर्तव्य आहे.कारण ‘जान है तो जहाँ है.. मानवी शरीरातील सर्वात महत्वाचा अवयव म्हणजे हृदय, व्यायामाचा अभाव, चुकीच्या आहारामुळे तसेच मधुमेह , उच्च रक्तदाब, अतिरिक्त वाढलेली चरबी यामुळे हृदयरोगाचा धोका वाढत आहे.यावर वेळेवर निदान आणि उपचार केल्यास हृदयरोगाचा मोठा धोका टाळता येतो.
8 ऑगस्ट ला आयोजित या मोफत आरोग्य तपासणी शिबिरात मधुमेह(शुगर)उच्च रक्तदाब(बी पी),ईसीजी आदीं सर्व आजारावर डॉक्टरांचे मार्गदर्शन , सल्ला आणि तपासणी मोफत होणार आहे.तेव्हा या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा पूर्णपणे लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक दैनिक देशोन्नतीचे शाखा व्यवस्थापक लक्ष्मीकांत संगवई,माधवबाग चे वरिष्ठ अधिकारी प्रशांत ठाकरे,प्रसिद्ध आरोग्यतज्ञ डॉ गौरव शेळके तसेच दैनिक देशोन्नतीचे कामठी तालुका प्रतिनिधी संदीप कांबळे यांनी केले आहे. या मोफत आरोग्य तपासणी शिबिराला माधवबाग चे वरिष्ठ अधिकारी प्रसिद्ध आरोग्यतज्ञ डॉ गौरव शेळके विशेष आरोग्य सेवा पुरवतील.