संदीप कांबळे ,कामठी
कन्हान ता प्र 26 : – शहरातील अर्ध्या भागातील सांडपाणी प्रभाग क्र ३ च्या रेल्वे स्टेशन रोड जवळुन वाहुन नेणा-या नाली व मोठा नाला तुटुंब भरून वाहत असल्याने त्वरित सापसफाई करून स्वच्छ करित संभाव्य धोका टाळण्याकरिता पावसाळयापुर्वी कन्हान शहरातील नाल्या व मोठया नाल्याची स्वच्छ करण्यात यावी अशी मागणी मुख्याधिकारी हयाना निवेदन देऊन नगरसेवक राजेश यादव यांनी केली आहे.
नगरपरिषद कन्हान पिपरी प्रभाग क्र ३ चा नगर सेवक असुन माझ्या प्रभागातुन कन्हान शहराच्या अर्ध्या भागातील साडपाणी १) महामार्गावरील नाका नं ७ ते पोलीस स्टेशन सामोरून नदीत प्रवाहित होते . २) लोहिया ले-आऊट ते रेल्वे मालाधक्का ते स्टेशन रोड परिसरातुन कन्हान नदीत प्रवाहीत होते. हा नाला जाम झालातर हे सांडपाणी रामनगर, लोहिया ले-आऊ ट व गणेश नगर च्या घरात शिरते.३) रेल्वे च्या तिस-या रेल्वे ट्रक मुळे या मुख्य नाल्याचे पाणी जाम होऊन स्टेशन रोड व जवळील लोकवस्तीच्या घरात शिरून रोगराईचा मोठा प्रश्न उदभवण्याचा धोका नाकारा येत नाही. करिता या लोकवस्ती परिसरातील नाल्या व मोठा नाला आणि रेल्वे लाईन खालील नाला पावसा ळयापुर्वी युध्द स्तरावर तातडीने स्वच्छ करण्यात यावा . कारण पावसाळा लागण्यास एक महिन्या आहे. या गंभीर समस्येवर लक्ष केंदित करून तातडीने कार्यवा ही करण्याची मागणी नगरसेवक राजेश यादव हयानी नगरपरिषद मुख्याधिकारी हयाना निवेदन देऊन केली आहे.