येरखेडा ग्रामपंचायतला नगर पंचायतचा दर्जा देण्याआधी कोराडी ग्रा प ला नगर पंचायत चा दर्जा द्या – नागरिकांची मागणी

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- गावाचा विकास साधण्यासाठी गावातील ग्रामपंचायत महत्वाचा दुवा ठरते व गावातील तळागळातील शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या विविध कल्याणकारी योजना पोहोचविण्याचे कार्य ग्रामपंचायत करत असतात तसेच ग्रामपंचायतच्या माध्यमातुन गावाचा विकास साधता येतो. शासकीय निधीअभावी गावाचा विकास रखडतो या वास्तविकतेला नाकारता येत नाही.नुकतेच डीपीडीसी ची मोठी निधी येरखेडा ग्रा प ला नाकारण्यात आली .तसेच मागिल 20 वर्षापासून कामठी विधानसभा मतदार संघात भाजप चे आमदार प्रतिनिधित्व करीत आहेत मात्र डीपीडीसी अंतर्गत मिळणाऱ्या निधीतून येरखेडा ग्रा प ला नेहमी वगळण्यात आले. येरखेडा ग्रा प ची निवडणूक होऊन अडीच वर्षाचा कालावधीसुद्धा होणे बाकी आहे तरीसुद्धा राजकीय कुरघोडीतून येरखेडा ग्रा प ला नगर पंचायत चा दर्जा देण्याची मागणी जोर धरत आहे.तत्पूर्वी माजी पालकमंत्री बावनकुळे यांच्या निवास स्थानाच्या हाकेच्या अंतरावर असलेले कोराडी ग्रा प अजूनही ग्रा प स्तरावर कायम आहे तेव्हा विकासात्मक दृष्टिकोनातून आधी कोराडी ग्रा प ला नगर पंचायतचा दर्जा द्यावा त्यानंतर येरखेडा ग्रा प चा विचार करावा अशी मागणी नागरिक करीत आहेत.

नागपूर जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून कामठी तालुक्यातील येरखेडा ग्रामपंचायत ची ओळख आहे.येरखेडा गावाचा विस्तार व्यापक प्रमाणात वाढीवर आहे. ग्रामवासीयांना सोयी सुविधा पुरविण्यासाठी येरखेडा ग्रामपंचायत सदा अग्रेसरची भूमिका साकारत आहेत.तेव्हा गावाचा विकास साधण्यासाठी शासनाने जास्तीत जास्त निधी देऊन ग्रा प ला उपकृत करावे मात्र घाणेरड्या राजकारणाची व्युव्हरचना आखून येरखेडा ग्रा प ला नगर पंचायतचा दर्जा देण्याचे ठरविल्या जात आहे.येरखेडा ग्रा प ला नगर पंचायत चा दर्जा होणे याला नागरिकांचा विरोध नाही परंतु ग्रा प ची निवडणूक होऊन अडीच वर्षाचा कालावधी सुद्धा लोटने बाकी आहे तत्पूर्वी नगर पंचायत चा दर्जा ठरविणे योग्य ठरत नाही.विकासाची भूमिका इतकी जास्त डोक्यात शिरली असेल तर माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निवसस्थानाजवळ असलेल्या कोराडी ग्रा प ला आधी नगर पंचायत चा दर्जा देऊन नागरिकांना उपकृत करावे तसेच नजीकच्या ग्रा प विश्वासात घेऊन नगर पालिका तयार करण्यात यावे अशी मागणी जोर धरत आहे.

– माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर

– मागिल 25 वर्षांपासून माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर यांच्या नेतृत्वात येरखेडा ग्रा प चा कारभार सुरू असून येरखेडा ग्रा प वर कांग्रेसची एकहाती सत्ता आहे.माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या येरखेडा ग्रा प ची सत्ता काबीज करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले.येत असलेले अपयश लक्षात घेता बावनकुळे यांनी मागील काही वर्षांपूर्वी कांग्रेस चे माजी सरपंच मनीष कारेमोरे यांना पदाचा दुरुपयोग केल्याचा आरोप करीत कुरघोडीचे राजकारण करून स्वतःच्या ताब्यात घेतले.तर नुकतेच अडीच वर्षांपूर्वी झालेले येरखेडा ग्रा प निवडणुकीत पुनश्च कांग्रेस ची सत्ता कायम राहली तर नवनिर्वाचित सरपंच सरिता रंगारी विदर्भातून सर्वाधिक मताने निवडून आल्या.सर्वतोपरी प्रयत्न करूनही येरखेडा ग्रा प काबीज होताना दिसत नसल्याने कुरघोडीचे राजकारण करून आता येरखेडा ग्रा प नगर पंचायत चा दर्जा देण्याचे ठरवीत आहेत.बावनकुळे यांना इतकाच विकास साधायचा असेल तर सर्वात आधी कोराडी ग्रा प ला नगर पंचायत चा दर्जा द्यावा वा महादुला,कोराडी आदी नजीकचे क्षेत्र जोडून नगर पालिका तयार करावी असे मत माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर यांनी प्रस्तुत प्रतिनिधींशी व्यक्त केले.

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Sr. DST SECR की गाड़ी का हुआ एक्सीडेंट

Sat Jun 29 , 2024
नागपुर :- वडसा के पास Sr. DST SECR की गाड़ी का एक्सीडेंट हुआ,1 की मौत, 2 घायल। अधिकारी को लाने जा रहा था। दोपहर 3 बजे की घटना। GM inspection मे गई थी गाड़ी। चांदा फोर्ट से इतवारी इंस्पेक्शन था। कुछ सामान लेकर गई थी गाड़ी। नागपुर वापस आ रही थी। खड़े ट्रेलर से जा टकराई। मरने वाला कैमरशिल विभाग […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com